२ नोव्हेंबर – दुःख एक तात्कालिक सत्य

प्रभू येशूला भेटायला किंवा त्याचे बोलणे ऐकायला जे लोक येत असत, त्यांना पाहून त्याला त्यांचा कळवळा येत असे. मेंढपाळ नसलेल्या मेंढरांसारखे ते त्याला दिसत. (मत्तय ९:३६) ते आजारी, दरिद्री, लाचार लोक आपली दुःखे घेऊन येशूकडे मोठ्या आशेने येत असावेत ह्यात शंका नाही.

येशू ख्रिस्ताने जे पहिले प्रवचन केले, ते ऐकायला लोकांचे मोठे घोळके जमा झाले होते आणि त्यांच्याशी बोलायला तो एका डोंगरावर गेला होता. म्हणून त्याला डोंगरावरचे प्रवचन असे नाव पडले आहे. येशूच्या ह्या पहिल्या प्रवचनात त्याने देवाचे राज्य कसे असेल, त्यातील शासनव्यवस्था कशी असेल, आणि त्यातील मानवी नागरिकांची जीवनशैली कशी असेल ह्याविषयीची संकल्पना लोकांपुढे मांडली. पण त्या प्रवचनाचे प्रास्ताविक मात्र वर्तमान मानवी जीवनातील  दुःखाविषयी होते. लोकांच्या दुःखांची येशूला पूर्ण जाणीव होती एवढेच नाही, तर दुःख सोसण्यातसुद्धा धन्यता आहे असे सांगून देवाच्या राज्यात ते सर्व दुःख दूर होईल ह्याची खात्री त्याने लोकांना दिली. येशूने उच्चारलेले आशीर्वादाचे सुंदर शब्द असे होते:

“जे आत्म्यानं दीन ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.

“जे शोक करीत आहेत ते धन्य, कारण त्यांचं सांत्वन केलं जाईल.

“जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचं वतन मिळेल.

“जे नीतिमत्वाचे भुकेले व तान्हेले ते धन्य, कारण ते तृप्त होतील.

“जे दयाळू ते धन्य, कारण त्यांच्यावर दया केली जाईल.

“जे अंतःकरणानं शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील.

“जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे पुत्र म्हटलं जाईल.

“नीतिमत्वाकरता ज्यांचा छळ झाला आहे ते धन्य, कारण स्वर्गाचं राज्य त्यांचं आहे.

“आनंद करा आणि हर्षित व्हा, कारण स्वर्गात तुमचं प्रतिफळ मोठं आहे.” (मत्तय ५:१-१२)

दुःख जरी एक सत्य असले तरी ते केवळ एक तात्कालिक सत्य आहे. कारण देवाच्या अंतिम योजनेत दुःखाचा अंत लिहिलेला आहे: “पहा, देवाचा मंडप मनुष्यांत आहे, तो त्यांच्याबरोबर वसती करील. ते त्याची प्रजा होतील, आणि देव स्वतः त्यांच्याबरोबर राहील. तो त्यांच्या डोळ्यांतले सर्व अश्रू पुसेल, आणि ह्यापुढे मरण राहणार नाही, दुःख नाही, आक्रोश नाही, किंवा क्लेशही नाहीत. कारण पहिल्या गोष्टी निघून गेल्या आहेत.” (प्रकटी २१:१-४)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s