१३ ऑक्टोबर – मुक्तमार्ग

मानवी प्रगतीत रस्त्यांना मोठे महत्त्व आहे. रस्ता रुंद आणि सपाट असेल, त्यात खड्डे नसतील, त्यात वेडीवाकडी वळणे नसतील, तर आपला प्रवास निश्चितपणे सुखकर आणि जलद होतो. म्हणून अगदी दुर्गम प्रदेशात, डोंगर-दऱ्यांतून, नद्या ओलांडून, प्रवास करता यावा ह्यासाठी सगळ्या जगभर रस्ते बांधले गेले आहेत. भारतात एकूण ३२ लाख किलोमीटर लांबीचे रस्त्यांचे जाळे आहे, ज्यात सतत नवीन रस्त्यांची भर घातली जात आहे. सध्याच्या रस्त्यांचा दर्जा सुधारण्याचे तसेच त्यांची रुंदी वाढवण्याचे प्रकल्प राबवले जात आहेत.

आजच्या परिस्थितीत लोकांना त्यांच्या आध्यात्मिक प्रवासासाठीही सोपा, सरळ, सपाट असा मुक्तमार्ग हवा असला तर त्यात नवल नाही. अनेक वैकल्पिक आध्यात्मिक मार्ग आज उपलब्ध आहेत ज्यावर वेगवेगळी आकर्षणे, प्रलोभने आणि सुखसोयी दिसतात. पण वास्तवात त्यावर धोके असतात, कठीण वळणे असतात, अपघात होतात, किंवा अनेकदा ते मार्गच चुकीचे असल्याचे नंतर कळून येते. पण तेव्हा खूप उशीर झालेला असतो.

आजच्या ह्या पार्श्वभूमीवर प्रभू येशूने दोन हजार वर्षांपूर्वी दिलेला इशारा लक्षात घेण्यासारखा आहे. तो म्हणाला होता, “अरुंद दरवाजाने आत जा; कारण नाशाकडे नेणारा दरवाजा रुंद, आणि मार्ग पसरट आहे, आणि त्यानं आत जाणारे पुष्कळ आहेत. कारण जीवनाकडे नेणारा दरवाजा अरुंद आणि मार्ग संकुचित आहे, आणि तो ज्यांना सापडतो ते थोडे आहेत.”

पण आपल्यासाठी योग्य मार्ग कसा निवडायचा? आपण ज्याला गुरू मानतो तो खरा आहे हे कसे पारखायचे? ह्यावर येशूने सांगितले की, “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपा; ते मेंढरांच्या वेशात तुमच्याकडे येतात, पण आतून ते धरणारे लांडगे आहेत. तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल. काटेर्‍यांवरून द्राक्ष किवा केंकरीवरून अंजीर गोळा करतात काय? तसंच प्रत्येक चांगलं झाड चांगलं फळ देतं, पण कुजकं झाड वाईट फळ देतं. चांगलं झाड वाईट फळ देऊ शकत नाही; आणि कुजकं झाड चांगलं फळ देऊ शकत नाही. जे चांगलं फळ देत नाही असं प्रत्येक झाड तोडून अग्नीत टाकलं जातं. म्हणून तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.” (मत्तय ७:१३-२०)

आध्यात्मिक प्रवासासाठी द्रुतगती मुक्तमार्ग योग्य ठरेलच असे नाही.

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s