११ ऑक्टोबर – शक्य आणि अशक्य

अमेरिकन विचारवंत, शिक्षक व लेखक राइनहोल्ड नीबुर (१८९२-१९७१) ह्यांची एक सुप्रसिद्ध प्रार्थना आहे जी “सिरिनिटी प्रेअर” ह्या नावाने ओळखली जाते. त्यातील खालील भाग विशेषेकरून सुप्रसिद्ध आहेः

“हे देवा, ज्या गोष्टी मी बदलू शकणार नाही,
त्या मी धीरगंभीरतेने मान्य कराव्यात,

ज्या गोष्टी मी बदलू शकेन,
त्या बदलण्याचे मी धाडस करावे,

आणि त्या दोन्हींमधील फरक मला समजावा
एवढी सुबुद्धी माझ्यात असावी,
म्हणून माझ्यावर तुझी कृपा होऊ दे.”

ह्या प्रार्थनेमागचे तत्त्वज्ञान हे आहे जे आपल्याला आवडत नाही ते बदलणे जर सहज शक्य असेल तर ते बदलायचा प्रयत्न आपण करावा. पण एखादी गोष्ट बदलणे आपल्याला जर अगदी अशक्य वाटत असेल तर ती बदलण्याची खटपट करणे व्यर्थ आहे आणि आहे त्या परिस्थितीत आपण समाधान मानून राहावे.

पण जरा विचार करा की, आपल्याला काय करणे शक्य आहे आणि काय अशक्य आहे हे ठरवणे आपण परमेश्वरावर का सोपवावे? ते आपल्यालाच ठरवता येणार नाही का? चंद्रावर जाऊन परत येणे हे एके काळी अशक्य मानले गेले असावे, पण नंतर काही लोकांनी ते वास्तवात करून दाखवले. मागील २-३ शतकात विज्ञान आणि तंत्रज्ञानाची एवढी प्रचंड प्रगती झाली आहे की, पूर्वीच्या काळी अशक्य वाटलेली अशी असंख्य कामे आज सामान्य माणसे सहजपणे करू लागली आहेत.

किती तरी यशस्वी लोकांनी म्हटले आहे की, अशक्य हा शब्द त्यांच्या शब्दकोशात नाहीच. खरे तर तो कोणाच्याच शब्दकोशात असायचे कारण नाही. स्वतः प्रभू येशू म्हणाला होता की, कोणाकडे फक्त मोहरीच्या दाण्याएवढा विश्वास असेल तर तो एका डोंगरालादेखील येथून तेथे हलवू शकेल, त्याला काही अशक्य होणार नाही. (मत्तय १७:२०) येशू हेही म्हणाला होता की, माणसाला जे अशक्य असेल ते देवाला सहज शक्य आहे. (मत्तय १९:२६) आपण आपल्या बळावर काही करू शकलो नाही तर ते देवाच्या साहाय्याने आपण साध्य करू शकू.

एखादे काम कठीण आहे म्हणून ते करायचे सोडून द्यायचे, किंवा ते आव्हान समजून पूर्ण करायचे प्रयत्न करायचे, हे प्रत्येकाने स्वतःसाठी ठरवायचे आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s