३० जून – छोटी प्रार्थना

पवित्र शास्त्रातील ६६ पुस्तकांमध्ये स्तोत्रसंहिता हे पुस्तक खूप लोकप्रिय आहे. त्यात १५० स्तोत्रे आहेत, जी वेगवेगळ्या लोकांनी लिहिली आहेत. काहींचा आशय वैयक्तिक आहे, काहींचा सामूहिक. स्तोत्र म्हणजे परमेश्वराची प्रार्थना, त्याच्या थोरवीचे गुणगान, त्याच्या उपकारांचे स्मरण. स्तोत्र ११९ हे सर्वात लांब स्तोत्र आहे. त्याची रचना प्रत्येकी आठ-आठ वचनांच्या २२ भागांत केलेली आहे. त्याउलट स्तोत्र ११७ सर्वात लहान स्तोत्र आहेत. त्यात फक्त दोनच वचने आहेत. त्यासारखेच स्तोत्र १३४ हेही फक्त तीन वचनांचे आहे.

विशेष म्हणजे ज्या स्तोत्रसंहितेत १७६ वचने असलेल्या स्तोत्र ११९ ला मानाचे स्थान दिले गेले आहे, त्याच पुस्तकात केवळ दोन किंवा तीन वचने असलेल्या स्तोत्रांचाही समावेश आहे. कारण आपली प्रार्थना प्रदीर्घ असो अथवा अगदी छोटी, ती परमेश्वराच्या कानी पडते आणि तो तिचे उत्तर देतो. प्रभू येशूने प्रार्थनेविषयी एक दाखला सांगितला होता (लूक १८:९-१४) ज्यात दोन जणांच्या प्रार्थनांची त्याने तुलना केली होती. एक परोशी असतो तो मोठ्या आवेशाने लोकांपुढे देवाची लांबलचक प्रार्थना करतो. दुसरा जकातदार असतो जो भीतभीत फक्त एकच वाक्य बोलतो, “हे देवा, मज पाप्यावर दया कर,” पण देवापुढे तो नीतिमान ठरवला जातो.

स्वतः प्रभू येशू त्याच्या पित्याच्या सहवासात आणि त्याची प्रार्थना करण्यात खूप वेळ घालवत असे. योहान १७ हा संपूर्ण अध्याय म्हणजे येशूने पित्याला केलेली एक प्रार्थना आहे. पण वधस्तंभावर यातना सहन करत असताना त्याने केलेली विनवणी एकाच वाक्याची होती, “बापा, त्यांना क्षमा कर, कारण ते काय करतात हे ते जाणत नाहीत.” (लूक २३:३४)

आपण एखाद्या अधिकाऱ्यापुढे अर्ज सादर करतो तेव्हा त्यात आपल्या समस्येची सर्व पूर्वपीठिका आपल्याला मांडावी लागते. पण देवाची प्रार्थना करताना आपल्याला तसे करावे लागत नाही. कारण आपल्या समस्येची, परिस्थितीची आणि यातनांची त्याला पूर्ण जाणीव असते. “प्रभू, मला वाचव!” (मत्तय ८:२५) एवढी छोटी प्रार्थना पुरेशी आहे. तो आपल्याकडे धावून येईल.

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s