१७ मार्च – अंधकाराचा उत्सव

सन २००७ पासून “अर्थ आवर” किंवा “पृथ्वी तास” मार्च महिन्याच्या शेवटच्या शनिवारी जगभर पाळला जात आहे. आता त्याला एका मोठ्या चळवळीचे रूप मिळाले असून दर वर्षी व्यक्तिगत, सामाजिक, राष्ट्रीय आणि जागतिक स्तरावर त्याची लोकप्रियता वाढत चालली आहे. २०१७ सालचा पृथ्वी तास २५ मार्च रोजी पाळला जाणार आहे. त्या रात्री साडे आठ ते साडे नऊच्या दरम्यान एक तासभर गरज नसलेले सर्व दिवे बंद करावेत असे अपेक्षित आहे.

बायबल म्हणजे पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, प्रारंभी अंधकार होता. पण देव म्हणाला, “प्रकाश होवो!” आणि प्रकाश झाला, आणि देवाने पाहिले की, प्रकाश चांगला आहे. (उत्पत्ती १:१-५) देवाच्या निर्मितीच्या कार्यक्रमात प्रकाश आधी आला, मग जीवन आले. कारण प्रकाशाशिवाय जीवन शक्य नाही. ज्या काळात मानवी जीवन अगदी अविकसित होते त्या काळाला अंधारी युग म्हणण्याची इतिहासकारांची आणि शास्त्रज्ञांची प्रथा आहे ह्यात नवल नाही.

पवित्र शास्त्रातील जुना करार प्रकाशाच्या निर्मितीविषयी आणि त्याच्या चांगुलपणाविषयी सांगत असला तरी नवा करार मात्र ही कबुली देतो की, मानवाला प्रकाशाऐवजी अंधकार अधिक आवडला. आणि म्हणून प्रकाश आणि जीवन देण्यासाठी देवाला त्याच्या स्वतःच्या पुत्राला पृथ्वीवर पाठवावे लागले. (योहान ३:६-१९)

प्रभू येशू स्वतःविषयी म्हणाला होता, “मी जगाचा प्रकाश आहे; जो माझ्यामागं येतो तो अंधारात चालणार नाही, पण त्याच्याजवळ जीवनाचा प्रकाश राहील.” (योहान ८:१२) त्याची हीपण इच्छा होती की, त्याच्या अनुयायांना लाभलेला तो प्रकाश त्यांनी इतरांनाही द्यावा. “तुम्ही जगाचा प्रकाश आहा”, तो म्हणाला होता, “डोंगरावर वसलेलं नगर लपत नाही. किंवा कोणी दिवा पेटवून तो मापाखाली ठेवीत नाहीत, पण दिवठणीवर ठेवतात; आणि तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. तुमचा प्रकाश लोकांपुढं असा प्रकाशित होऊ द्या की, त्यांनी तुमची चांगली कामं बघून तुमच्या स्वर्गातील पित्याचं गौरव करावं. (मत्तय ५:१४-१६)

देवाने निर्माण केलेली सृष्टी त्याने निर्माण केलेल्या प्रकाशात उजळून जावी ही त्याची इच्छा होती. जर आपली आजची पिढी अंधकाराचा उत्सव साजरा करीत असेल, तर आपण आपल्या अग्रक्रमांवर, दिशांवर आणि जीवनाच्या व्याख्यांवर पुनर्विचार करण्याची नितांत गरज आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s