१९ डिसेंबर – वाढदिवस

जीवनाच्या प्रवासात आपण किती काळ घालवला ह्याची आठवण दर वर्षी येणारे आपले वाढदिवस आपल्याला करून देत असतात. वाढदिवस आपल्याला मागे वळून बघायला लावतात. वाढत्या वयाबरोबर मागे बघायची प्रवृत्तीही वाढते. पण ही प्रवृत्ती आपण टाळायला पाहिजे. सर्व महामार्गांवर अंतर दाखवणारे दगड किंवा फलक असतात ना? ते कधी सांगत नाहीत की, आपण प्रवासात किती अंतर पार केलेले आहे. पण आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पोहचायला आपल्याला पुढे किती अंतर पार करावे लागणार आहे ही माहिती ते देतात. ते आपल्याला पुढे बघायला लावतात. आपल्या मनात उत्सुकता निर्माण करतात. आपल्याला जेथे जायचे आहे ते ठिकाण कसे असेल? ते यायला किती वेळ लागेल? आपले वेग ठीक आहे ना? त्या ठिकाणाच्या काही खाणाखुणा दिसू लागल्या आहेत का?

आयुष्याचा प्रवास एखाद्या टीव्ही मालिकेसारखा किंवा कादंबरीसारखा असतो. पुढील अंकामध्ये किंवा प्रकरणामध्ये काय होणार हे आपल्याला माहीत नसते. पण जीवन ही काही रहस्यकथा नाही. तिचा अंत ज्ञात असतो. परिस्थिती बदलत राहिली तरी ती एका उत्कर्षबिंदूकडे जात असते.

पुन्हापुन्हा मागे वळून पाहण्याविषयी प्रभू येशूने स्पष्ट इशारा दिलेला आहे की, “जो कोणी नांगराला हात घातल्यावर मागं पाहतो तो देवाच्या राज्याला उपयोगी नाही.” (लूक ९:६२) जीवन भविष्यात आहे, भूतकाळात नाही.

संत पौलाने स्वतःविषयी लिहिले होते की, त्याने त्याचे लक्ष्य कदाचित गाठले नसेल. “पण मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून, मी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे धावतो.” (फिलिपै ३:१२-१४)

पण पुढचा मार्ग अंधुक किंवा खडतर असला तर काय करायचे? परमेश्वरावर विसंबून पुढे जायचे. दावीद त्याच्या एका स्तोत्रात लिहितो, “जीवनाचा मार्ग तू मला दाखवशील. तुझ्या सान्निध्यात परमानंद आहे. तुझ्या उजव्या हाताशी अनंतकाळाची सुखे आहेत.” (स्तोत्र १६:७-११)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s