११ नोव्हेंबर – संपत्तीची किंमत

भारत सरकारने ८ नोव्हेंबर २०१६ च्या रात्री अचानक जाहीर केले की, लोक वापरत असलेल्या किंवा त्यांच्या संग्रही असलेल्या पाचशे व एक हजार रुपयांच्या नोटा मध्यरात्रीपासून व्यवहारासाठी चालणार नाहीत. त्यांची किंमत शून्य झाली.

संपत्ती साठवण्याविषयी आणि पैशाची योग्य गुंतवणूक करण्याविषयी लोक सारखे विचार करत राहतात, प्रयत्न करत असतात. कोणी सोने किंवा जमीन विकत घेतात, कोणी घरे बांधतात, कोणी शेअर बाजारात खरेदी-विक्री करत राहतात. पण काही गोष्टी अशा अचानकपणे घडतात ज्यांची कल्पनासुद्धा त्यांनी कधी केली नसेल.

मोठ्या कष्टाने किंवा हौसेने बांधलेली घरे एखाद्या भूकंपात जमीनदोस्त होतात. न सांगता आलेल्या वादळात शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांचा विनाश होतो. शेअर बाजारात घसरण आली तर एका दिवसात लोकांचे लाखो किंवा कोटी रुपयांचे नुकसान होते. कोणाचा धंदा अचानक तोट्यात जाऊ शकतो. माणसांच्या नोकऱ्या जाऊ शकतात. आणि शेवटी माणूस कितीही धनवान असला तरी तो मृत्यूनंतर काही त्याची संपत्ती बरोबर घेऊन जाऊ शकत नाही, ती त्याला येथेच सोडावी लागते आणि त्याचे नातेवाईक आणि दुसरे लोक ती आपसात वाटून घेतात.

ह्या संदर्भात दोन हजार वर्षांपूर्वी प्रभू येशूने केलेला बोध आज आठवण्याजोगा आहे. तो म्हणाला होता, “तुम्ही पृथ्वीवर आपल्यासाठी ठेवी साठवू नका; तिथं कसर आणि जंग नाश करतात आणि चोर घर फोडून चोरतात. पण स्वर्गात आपल्यासाठी ठेवी साठवा; तिथं कसर आणि जंग नाश करीत नाहीत आणि चोर घर फोडून चोरीत नाहीत. कारण जिथं तुमचं धन तिथं तुमचं मनही राहील.” (मत्तय ६:१९-२१)

संत पौलानेही लिहिले होते की, जे आता सधन आहेत त्यांनी पृथ्वीवरील अशाश्वत धनावर भाव ठेवू नये. त्यांनी चांगल्या कामांत संपन्न व्हावे; परोपकारी व उदार असावे. ह्यातच त्यांच्या पुढच्या जीवनाचा पाया आहे. (१ तिमथ्य ६:१७-१९)

एकदा येशूकडे आलेल्या एका अधिकाऱ्याला त्याने सल्ला दिला होता, “तुझ्याजवळ जे आहे ते सगळं वीक, आणि गरिबांना वाटून दे, आणि स्वर्गात तुला धन मिळेल;  चल, माझ्यामागं ये.” (लूक १८:२२)

पैशाची सगळ्यांना गरज असते, पण पैशात आपण आपला जीव गुंतवणे लाभाचे नाही. आपण पृथ्वीवर देवासाठी जे काही करतो त्याच्या मोबदल्यात आपल्याला स्वर्गात संपत्ती मिळणार आहे. आपले खरे धन पृथ्वीवर नाही तर स्वर्गात साठवायचे आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s