२४ ऑक्टोबर – विश्वशांती

येशू ख्रिस्ताचा जन्म झाला तेव्हा भूतलावर स्वर्गातून देवदूत अवतरले आणि त्यांनी घोषणा केली, “पृथ्वीवर शांती”! पण तेव्हापासूनच्या दोन हजार वर्षांत खऱ्या अर्थाने विश्वशांती प्रस्थापित झालेली नाही. दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर, २४ ऑक्टोबर १९४५ रोजी संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली. त्यावेळी सदस्य देशांनी हे मान्य केले की, ते त्यांच्या शेजाऱ्यांबरोबर सहिष्णुतेने आणि शांतीने राहातील आणि जगभर शांतता आणि सुरक्षा नांदावी म्हणून एकत्रित प्रयत्न करतील.

ही उद्दिष्टे समोर ठेवून संयुक्त राष्ट्र संघटना आजवर दोन प्रकारे कार्य करत आली आहे. एक तर संघर्षात गुंतलेल्या देशांनी एकमेकांशी चर्चा करावी म्हणून ती सतत मध्यस्थी करत राहते. आणि दुसरे म्हणजे ते शक्य झाले नाही, तर त्यांच्यांत सलोखा घडवून आणण्यासाठी गरज पडल्यास बळाचाही वापर करायला ती तयार असते.

“यू.एन. पीसकीपिंग फोर्स”ला आजवर एकमेकांशी लढणाऱ्या अनेक देशांत शांती प्रस्थापित करण्यात यश मिळालेले आहे. सध्या हे आंतरराष्ट्रीय सैनिक दल जगात १६ क्षेत्रांत कार्यरत आहे. संघर्ष आटोक्यात आणल्यावर तेथे निःपक्षपणे निवडणुका घेणे, मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ न देणे, तसेच कायदा व सुव्यवस्था पुन्हा प्रस्थापित करायचे काम हे दल करत असते. भारताने संयुक्त राष्ट्रांच्या शांती प्रयत्नांना नेहमीच पाठिंबा दिलेला आहे आणि आजवर १,८०,००० भारतीय सैनिकांनी संयुक्त राष्ट्रांच्या २३ शांती मिशनमध्ये भाग घेतलेला आहे.

संयुक्त राष्ट्र संघटनेला अशा प्रकारची शांती दले तैनात करण्यासाठी दर वर्षी ८०० कोटी डॉलर खर्च करावे लागतात. पण तुलनात्मक दृष्टीने पाहिले तर हा खर्च काही मोठा नाही. कारण जगातील देश स्वतःला सुरक्षित ठेवण्यासाठी ह्याच्या अंदाजे दोनशे पटीने खर्च करत असतात!

संघर्ष आणि युद्ध ह्यांत नेहमीच गुरफटलेल्या विश्वात चिरस्थायी शांती नांदावी हे अजून तरी एक दूरचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी प्रयत्न करणाऱ्या लोकांचे काम खरोखर कठीण आहे. नवल नाही की, प्रभू येशूने त्यांची विशेष आठवण केली आणि तो म्हणाला, “जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाचे पुत्र म्हटलं जाईल.” (मत्तय ५:९)

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s