३० सप्टेंबर – स्वयंपूर्ण जीवन

आपण आपला आत्मविश्वास बळकट केला पाहिजे, आपण स्वावलंबी बनले पाहिजे, स्वयंपूर्ण जीवन जगले पाहिजे, अशा प्रकारचा सल्ला आपल्याला सारखा ऐकायला मिळत असतो. आणि एका अर्थी तो काही वावगा नाही. पण प्रत्यक्षात आपण तसे करू शकतो असे मात्र नाही. जगातील किती तरी गोष्टींवर आपले काहीच नियंत्रण नसते, किती तरी लोकांवर आणि सभोवतालच्या परिस्थितीवर आपण अवलंबून असतो.

संत पौलाला त्याच्या जीवनात नेहमीच हालअपेष्टा सहन कराव्या लागत असायच्या. एवढ्या की, तो ख्रिस्ताचा बेड्यांत असलेला वकील आहे असे तो स्वतःविषयी म्हणत असे. (इफिस ६:२०) पौलाने त्याच्या वेदना दूर व्हाव्यात ह्यासाठी प्रभूकडे विनंती केली तेव्हा त्याला हे उत्तर मिळाले की, “माझी कृपा तुला पुरे आहे, कारण अशक्तपणात माझे सामर्थ्य पूर्ण होते.” आणि त्यावर पौलाचे सांगणे हे होते की, “म्हणून ख्रिस्तासाठी आजारांत, अपमानांत व आपत्तींत, पाठलागांत आणि दुःखांत मी संतुष्ट असतो. कारण मी जेव्हा दुर्बळ आहे तेव्हा मी बलवान आहे.” (२ करिंथ १२:८-१०)

खरोखर, देवाची कृपा ही कोणत्याही परिस्थितीत आपल्यासाठी पुरेशी असते. मुख्य म्हणजे आपले तारण होते ते कृपेमुळे. आपण स्वतःच्या प्रयत्नांनी आपले तारण करून घेऊ शकत नाही. तारण हे देवाचे दान आहे. (इफिस २:५-९) देवाची कृपा ही नेहमीच आपल्यासाठी पुरेशी असल्यामुळे आपल्याला दुसरे मार्ग शोधायची किंवा अन्य दरवाजे ठोकायची गरज उरत नाही. पण आपल्या हातून अपराध घडतात तेव्हा काय? तेव्हासुद्धा. कारण असे म्हटले आहे की, जेथे पाप वाढते, तेथे कृपाही त्या प्रमाणात वाढते! (रोम ५:२०)

प्रभू येशू म्हणाला होता की, “मी वेल आहे, तुम्ही फाटे आहा, जो माझ्यात राहतो आणि मी त्याच्यात राहतो तो पुष्कळ फळ देतो, कारण माझ्यावाचून वेगळे असल्यास तुम्हाला काही करता येत नाही.” (योहान १५:५) ख्रिस्तापासून वेगळे राहून ख्रिस्ती जीवन जगता येत नाही. आपल्याला काहीही करायला लायक बनवते ती देवाची कृपा. तीच आपले जीवन स्वयंपूर्ण बनवते. (२ करिंथ ३:५)

संत पौलाने लिहिलेल्या बहुतेक पत्रांच्या शेवटी ही प्रार्थना आढळते की, “आपला प्रभू येशू ख्रिस्त ह्याची कृपा तुम्हा सर्वांबरोबर असो. आमेन.” पवित्र शास्त्राचा शेवटसुद्धा ह्याच वचनाने होतो. (प्रकटी २२:२१) ह्या आशीर्वादात माणसाच्या स्वयंपूर्ण जीवनाचे रहस्य आहे.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s