२६ सप्टेंबर – स्वच्छता व शुद्धता

वैयक्तिक स्वच्छता ठेवण्यावर तसेच आपला परिसर स्वच्छ राखण्यावर हल्ली खूप भर दिला जात आहे. आपल्याला सांगितले जात आहे की, स्वतःला चांगल्या सवयी लावा, जेवणापूर्वी हात धुवा, रस्त्यावर खाऊ नका, इकडे तिकडे थुंकू नका, प्लास्टिकच्या वस्तू फेकू नका, कचऱ्याची नीट विल्हेवाट करा. बाजारात येत असलेली नवनवीन उत्पादने दावा करीत आहेत की, ती वापरल्याने आपली त्वचा, हात, श्वास स्वच्छ होतील, आपले पाणी, कपडे, घरे स्वच्छ राहतील. आपले कम्प्यूटर व सेलफोन हेदेखील वेळोवेळी स्वच्छ करण्यासाठीचे सॉफ्टवेअर आता वापरावे लागत आहे.

स्वच्छ राहणी एक देवभिरूपणाचे लक्षण समजले जाते. पवित्र शास्त्रातील जुन्या करारात यहुदी लोकांना स्वच्छतेविषयी किती तरी सूचना दिल्या गेलेल्या आढळतात. कोणत्या गोष्टींना अस्वच्छ किंवा निषिद्ध मानायचे आणि त्यांना कसे हाताळायचे हेही त्यात सांगितलेले आहे.

प्रभू येशूने मात्र स्वच्छतेकडे एक नव्या दृष्टिकोणातून पाहिले आणि त्याने मनुष्याच्या आंतरिक शुद्धतेला एक उच्च स्थान दिले. एकदा येशूला एका परोशी माणसाने त्याच्या घरी भोजनाचे आमंत्रण दिले. येशूने नुकतेच त्याचे भाषण संपवले होते आणि तो सरळ जेवायला बसला. (लूक ११:३७-५२) परोश्याला त्याचे नवल वाटले कारण ते लोक जेवणाआधी हात धुवायचे एवढेच नाही तर भांडीसुद्धा धुऊन घेत असत. येशू त्याला म्हणाला की, थाळी आणि प्याले बाहेरून स्वच्छ करणे चांगले असले तरी ते जर आतून अस्वच्छ राहिले असतील तर त्याचा काही फायदा नाही. त्याने समजावून सांगितले की, तशाच प्रकारे माणसाचा अंतर्भाग अपहार आणि दुष्टभाव ह्यांनी भरलेला असला तर केवळ बाहेरील स्वच्छता राखण्याने काही साध्य होणार नाही.

ह्यासारखीच दुसरी एक घटना नव्या करारात नमूद केलेली आहे. (मार्क ७:१-२०) त्यावेळी येशूने स्पष्ट केले की, अन्न शरीराला अशुद्ध करू शकत नाही कारण ते अंतःकरणात नाही पण पोटात जाते आणि तेथून शौचकूपात बाहेर जाते. पण  “माणसाच्या अंतःकरणातून दुष्ट विचार निघतात. व्यभिचार,  जारकर्म, खून, चोर्‍या, लोभ, दुष्टपणा, कपट, कामातुरपणा, दोषित दृष्टी, दुर्भाषण, गर्व, आणि मूर्खपण, ह्या सगळ्या वाईट गोष्टी आतून निघतात आणि माणसाला विटाळवितात.”

आपण आपले हात आणि शरिरे स्वच्छ ठेवणे आरोग्यदायी आहे. आपले पर्यावरण स्वच्छ राखणे ही आपली जबाबदारी आहे. पण त्याशिवाय देव आपल्याकडून ही अपेक्षा करतो की, आपले अंतःकरण आणि मन स्वच्छ असावे. बाहेरची स्वच्छता अंतरीचा अमंगळपणा धुऊन टाकायला पुरेशी नाही.

(डॉ. रंजन केळकर)

 

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s