२५ ऑगस्ट – दूर कुठे तरी

जीवनात कधी कधी अशी काही परिस्थिती निर्माण होते, अशा काही गोष्टी घडतात की, सगळे सोडून दूर कुठे तरी निघून जावेसे वाटते. पण बहुतेक तसे करणे अशक्य असते. कामाच्या जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात. किंवा मुलांच्या परीक्षा असतात. किंवा घरी कोणी आजारी असते. ह्या सगळ्या गोष्टी सोडून आपण कुठे कसे जाणार? तसे केले तर तो स्वार्थ म्हणावा लागेल. मग मनातल्या मनात टेन्शन वाढत जाते. जीवन आणखीच असह्य बनत जाते.

शरीरासाठी, मनासाठी आणि आत्म्यासाठी अधून मधून वातावरणातला बदल फायद्याचा असतो. दोन-चार दिवस ईमेल चेक केली नाही तर आभाळ कोसळेल असे आपल्याला वाटते का? जेथे मोबाइल नेटवर्क नाही अशा एका दूरच्या ठिकाणी जाऊन राहायला आपल्याला भीती वाटते का? काही दिवस आपली आवडती मालिका पाहता आली नाही तर आपल्याला काही चुकल्याचुकल्याचा भास होत राहतो का? पण ह्या सगळ्या गोष्टींव्यतिरिक्त जीवनात खूप काही अनुभवण्यासारखे आहे.

समुद्रकिनारी काही वेळ उभे राहून उसळणाऱ्या लाटा, आकाशात रंग बदलणारे ढग, दूरवरचे क्षितिज, मोठी जहाजे, लहान बोटी, ह्या गोष्टी बघताना मन किती मोहून जाते? एखादा डोंगर चढून भोवतालचा प्रदेश एका नव्या नजरेने पाहायला किती छान वाटते? उगवता सूर्य, मावळता सूर्य, पावसाची सर, वाऱ्याची मंद झुळुक, ह्यांची आपापली मजा असते ना?

पवित्र शास्त्रात लिहिले आहे की, प्रभू येशू अनेकदा दूर कुठे तरी निघून जात असे आणि एकांतवासात राहत असे. कधी तो शिष्यांना बरोबर घेऊन जात असे, तर कधी तो त्यांना वेगळे पाठवून देत असे. कधी तो एकटाच एखाद्या डोंगरावर जाऊन प्रार्थना करत असे. (मार्क ६)

जगाच्या सर्व आकर्षणांपासून दूर गेल्यावर परमेश्वराच्या सान्निध्याचा अनुभव आल्यावाचून राहत नाही. तो थोड्या काळासाठी असला तरी तो अवर्णनीय असतो. “प्रभू माझा मला जेव्हा बसे घेऊन एकांती, किती वर्णू मला तेव्हा घडे जी हो सुखप्राप्ती…” हे कविवर्य नारायण वामन टिळक ह्यांचे गीत सर्व काही सांगते.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

One thought on “२५ ऑगस्ट – दूर कुठे तरी

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s