२० ऑगस्ट – आकाशातील डोळे

इन्सॅट-३डी-आर हा भारतीय बनावटीचा हवामानशास्त्रीय उपग्रह पृथ्वीभोवतीच्या  भूस्थिर कक्षेत २८ ऑगस्ट २०१६ रोजी सोडला जाणार आहे. त्यासाठी वापरले जाणारे जी.एस.एल.व्ही हे प्रक्षेपण यानही भारतीय बनावटीचे आहे. पृथ्वीच्या वातावरणातील हालचालींवर अहोरात्र नजर ठेवायचे काम हा उपग्रह करणार आहे.

सध्या वेगवेगळ्या देशांचे मिळून एक हजाराहून अधिक उपग्रह पृथ्वीभोवती अव्याहतपणे प्रदक्षिणा घालत आहेत. त्यातील काही हवामानात होत असलेले बदल टिपत असतात. काही पृथ्वीच्या नैसर्गिक संसाधनांविषयी माहिती गोळा करत असतात. काही उपग्रह लष्करी हालचालींचे बारकाईने निरीक्षण करत राहतात. एका अर्थी हे सगळे उपग्रह म्हणजे मावनाने निर्माण केलेले आकाशातील डोळे आहेत असे म्हणता येईल. मानव जेथे स्वतः जाऊ शकत नाही तेथून हे डोळे त्याच्यासाठी पाहायचे काम करतात.

मानवनिर्मित नसलेले असेही डोळे आकाशात आहेत, आणि ते आहेत परमेश्वराचे डोळे. पवित्र शास्त्र म्हणते की, सगळीकडे जे काही चालले आहे ते परमेश्वर बघत असतो. (नीतिसूत्रे १५:३) पण विशेषेकरून परमेश्वराचे डोळे नीतिमान माणसांवर सदैव असतात. (स्तोत्र ३४:१५)

लहानपणी मी कधी आजारी पडत असे, तेव्हा माझी आई मला जवळ घेऊन, माझा लाड करून, गाणी गाऊन, मला झोपवायची. पण त्यानंतर ती स्वतः मात्र झोपत नसे. ती जागी राहून माझ्यावर लक्ष ठेवायची. आता म्हातारपणी, परमेश्वर माझ्यासाठी तसेच करतो. मी माझ्या सगळ्या समस्या, चिंता, भीती, त्याच्यावर सोपवून शांतपणे झोपतो. पण तो स्वतः झोप घेत नाही. त्याला डुलकीही लागत नाही. (स्तोत्र १२१:४) मी झोपलेलो असताना तो माझ्यावर लक्ष ठेवून असतो. आणि सकाळी मी ताजातवाना होऊन उठतो.

परमेश्वराचे डोळे त्याच्या मुलांवर नेहमीच असतात.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s