१५ ऑगस्ट – विचारस्वातंत्र्य

१८व्या शतकातील फ्रेंच विचारवंत रूसो म्हणाले होते की, मनुष्य स्वतंत्र जन्माला येत असला तरी तो सर्वत्र बंधनात आहे. माणसाला जे स्वातंत्र्य मिळायला हवे त्यातील मोजकेच स्वातंत्र्य त्याला कायद्याने दिले जाते, उलट काही स्वातंत्र्य कायद्याद्वारे सीमित केले जाते. म्हणून मानवी स्वातंत्र्याचा लढा अजून सुरूच आहे. एक स्वातंत्र्य मात्र असे आहे जे माणसाकडून कोणीही हिरावून घेऊ शकत नाही, आणि ते आहे विचारस्वातंत्र्य.

कोणत्याही एका क्षणी आपल्या मनात असंख्य विचार घोळत असतात. अशी एक वेळ येते जेव्हा ते विचार आपण मनातल्या मनात ठेवूच शकत नाही, आणि ते आपल्या मुखाद्वारे वाहू लागतात. शेवटी अंतःकरणातले सगळे दुष्ट विचार बाहेर पडल्यावाचून राहत नाहीत. (मत्तय १५:१८-१९) ह्यासाठीच की काय, जेव्हा एखाद्या देशात नागरिकांचे स्वातंत्र्य सीमित करायची गरज भासते तेव्हा सर्वप्रथम विचारस्वातंत्र्यावर बंधने घातली जातात.

आजच्या इंटरनेट व सोशल मीडियाच्या युगात लोकांना स्थानिक किंवा राष्ट्रीय बंधने ओलांडून त्यांचे विचार जगापुढे मुक्तपणे मांडणे शक्य होते. कधीकधी असंवेदनशील विधानांमुळे ते अडचणीत सापडतात, त्यांच्यावर आक्षेप घेतला जातो. कधीकधी त्यांना त्यांचे वक्तव्य बदलायला भाग पाडले जाते किंवा त्यांना माफीही मागावी लागते. पवित्र शास्त्र म्हणते की, परमेश्वर ज्ञानी लोकांचे विचार जाणतो की, ते व्यर्थ आहेत. (१ करिंथ ३:२०)

आपल्या विचारस्वातंत्र्याचा पूर्णपणे उपभोग करायला आपण मोकळे आहोत. पण आपल्या मनातील विचार जाहीरपणे व्यक्त करायला आपण तेवढे मोकळे नाही. आपले अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य मुळातच मर्यादित आहे आणि ते आपण अतिशय काळजीपूर्वक आणि जबाबदारी बाळगून वापरण्याची गरज आहे. पवित्र शास्त्रात सांगितल्याप्रमाणे ख्रिस्ताच्या आज्ञापालनासाठी आपण आपल्या मनातल्या प्रत्येक विचाराला कह्यात आणायला शिकले पाहिजे. (२ करिंथ १०:५)

(डॉ. रंजन केळकर)

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s