१ ऑगस्ट – जीवनशैली

जगातील कोट्यावधी माणसांपैकी प्रत्येकाला असे वाटते की, आपली स्वतःची एक स्वतंत्र ओळख असावी. ते शक्य नसेल तर निदान ज्या समाजात आपण वावरतो,  ज्या परिसरात आपण काम करतो, किंवा ज्या कुटुंबात आपण राहतो, तेथे तरी आपल्याला स्वतःचे एक महत्त्वाचे स्थान असावे. कदाचित अनेक लोक आपल्याला ओळखतसुद्धा असतील. पण इतरांना आपली खरी ओळख होते ती आपल्या चेहऱ्यामुळे किंवा नावामुळे नाही, तर आपल्या जीवनशैलीमुळे. आपण काय करतो, कसे वागतो, काय बोलतो ह्याकडे लोकांचे सतत लक्ष असते. ते मनातल्या मनात आपला न्याय करत राहतात आणि आपल्याविषयीची एक कल्पना त्यांच्या मनात आकार घेत असते.

आपण आपले जीवन जगत असताना आपल्याला पदोपदी, क्षणोक्षणी निर्णय घ्यावे लागतात, विकल्प निवडावे लागतात. हे निर्णय घेणे आणि विकल्प निवडणे सर्वस्वी आपल्या हातात असते, त्यासाठी केवळ आपणच जबाबदार असतो. जेव्हा आपण एकाच प्रकारचे विकल्प पुन्हापुन्हा निवडू लागतो, सतत एकाच दिशेने प्रवास करू लागतो, तेव्हा कालांतराने तशी आपली जीवनशैली बनते. मग आपणच ठरवलेल्या चाकोरीतून आपण बाहेर पडू शकत नाही. स्वतःभोवती आखलेल्या सीमारेषा आपण ओलांडू शकत नाही.

कोणी म्हणतात की, जीवन आपल्याला नाइलाजाने जगावे लागते कारण पूर्वीच्या कर्मांची फळे आपल्याला भोगायची असतात. कोणी म्हणतात की, आपला धर्म आपली जीवनशैली ठरवतो. कोणी म्हणतात की, जीवन जगणे ही एक कला आहे, जी एका अभ्यासक्रमाद्वारे आपल्याला पैसे देऊन शिकावी लागते.

ख्रिस्ती धर्माचे आचरण करणाऱ्यांना आपली व्यक्तिगत जीवनशैली निवडण्याचे आणि तिच्याद्वारे जगाला आपली ओळख करून देण्याचे पूर्ण स्वातंत्र्य आहे. पण जीवनशैलीच्या संदर्भात संत पौलाने दोन मार्गदर्शक तत्त्वे सांगितलेली आहेत जी लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे. एक तर आपण शब्दाने किंवा कृतीने जे काही करतो ते त्यामुळे परमेश्वराचे गौरव होईल असे असावे. (१ करिंथ १०:३१, कलसै ३:१७) दुसरे हे की, ख्रिस्ताच्या जीवनशैलीशी आपण समरूप व्हायचा प्रयत्न करावा. आपल्याकडे पाहून लोकांना असे वाटावे की, आपण स्वतः जगत नसून ख्रिस्त आपल्या ठायी जगत आहे. (गलती २:२०)

(डॉ. रंजन केळकर)

 

Advertisements

11 thoughts on “१ ऑगस्ट – जीवनशैली

 1. ओम मी नेहमी सकारात्मक विचार करते व तसं चांगल घडत पण पण काही वेळे ला त्रास झाला कि अस विचार येतात आणि श्री गोंदवले कर महाराज ब्रह्मचैतन्य महाराज सांगतात राम नां घ्या कधी कमी पडणार नाही तसं ख्रिस्त घर्म मध्ये पण मानून जगावं खर आहे मी पुष्कर कडे चर्च दिसलं कि सहज हात जोडायचे पुष्कर म्हणायचा तुला आशिर्वाद दिले त्यांनी

  Like

 2. ॐ तारिख 11.9(सप्टेबंर) 2016.

  नमस्कार !

  आज मला खुप खुप चांगल वाततं आहे.
  मि अमेरिका तेथे आहे. चर्च मध्ये 1एक तास बसून तेथील
  प्रार्थना मध्ये सहभाग घेतला आहे.
  हॉल मध्ये आधी च पंधरा मिनिट पोहचलो.
  गुरुं चिं नुसती धातूची खुण व त्यांना लावलेली फुल गुच्छ.
  बाजूने मेणबत्या स्टॅन्ड. कांही वेळात चं हॉल शिष्य यांनी भरला.
  मेणबत्या लावल्या.
  तेथील गुरुं नि कांही सांगून प्रार्थना म्हणण्यास सुरुवात केली.
  गुरुं चं तोंड मूळ येशू चं चिन्ह ह्या कडे होत.
  संगीत मय प्रार्थना व वाचून प्रार्थना केली. काही वेळेला उभं राहून व
  काही वेळेला बसून प्रार्थना केली.
  उंच अशा रिबिनी सारख्या पंखा होता. तेथील शिष्य यांनीधरलेले.
  मध्यातून मेणबत्या. गुरुं चं चिन्ह असलेले पकडून शिष्य जागेवर नेऊन
  उभे राहून प्रार्थना केली.
  मला प्रार्थना समजली नाहीपण माझं मन इतकं एकाग्र झालं कि सांगता येणार नाही.
  एक तास कसा संपला म्हणण्या पेक्षा एकाग्र झाला याचंच मन भरून गेलं.

  आपण येशू गुरुं बद्दल रोजच लिहिता. मी पण बरंच लिखाण केलं.
  माझ्या मनांत एकदा चर्च मध्ये जाऊन प्रार्थना करावी असं सारखं वाटायचं
  आज माझ्या मुलानं पुष्कर यांनीं ईच्छा पूर्ण केली.

  कोणते हि गुरुं असोत आपलं मन असलं कि तेथे पर्यंत आपण पोहचतो.
  आज मला खूप बरं वाटत आहे. सर्व चर्च व तेथील सर्वां मध्ये बसले याचं !

  येशूं गुरुं नां नमस्कार.

  आपलं गुरुं येशू गुरुं बद्दल लिहलेलं वाचन करून जास्त चं मन तृप्त आहे.
  आपणास पण नमस्कार !

  बाकि ठिक
  वसुधालय

  Like

  • प्रिय वसुधाताई,
   तुम्ही अमेरिकेत आहात आणि आनंदात आहात हे वाचून बरे वाटले. चर्चमध्ये जायची संधी तुम्हाला मिळाली हे चांगले झाले. भारतातही अधून मधून तुम्ही चर्चमध्ये जाऊ शकता. प्रत्येक चर्चमधील उपासना काहीशी निराळ्या पद्धतीची असते, पण उपासनेच्या मागचा हेतू मात्र एकच असतो. परमेश्वराचे उपकारस्मरण करायचे, त्याच्या सान्निध्यात रमायचे, आपल्याला काही हवे असेल तर ते त्याच्याकडे मागायचे, आपल्या अपराधांच्या क्षमेसाठी प्रार्थना करायची.
   रंजन केळकर

   Like

   • ओम
    कोल्हापूर येथे चर्च ठिकाण पाहिले आहेपण आत जाऊन प्रार्थना करावी असं मन होत नाहीआजूबाजूचे राहणे व माझी तितकी त्यात गुंतून जाणे हि भावना नाहीफक्त आपण व मी केलेले लिखाण साठी कसं मन भावना व्यक्त होतात ते पाहिलं.आज खूप मन भरून आलं बसं एवढचं पुरे मलामी घर सांभाळणारी देऊळ येथे जाणारी आहे
    बाकी खूप काही करायचं नाही मलाकोठेही हात जोडून प्रार्थना केली कि ती देव व आपल्याला वाटणारे गुरुं यांच्या पर्यंत जात असं माझं मन आहेआता देव व गुरुं गुरुं यांना कांही मागायचे नाही मला बसं
    बाकि ठीक वसुधालय

    Liked by 2 people

  • प्रिय वसुधाताई,
   माझ्या लेखावर प्रतिक्रिया लिहिल्याबद्दल आभार.
   पण तुम्ही म्हणता तसे का व्हावे? उलट ज्या माणसाचे जीवन ख्रिस्ताशी एकरूप झाले आहे त्याने अधिक प्रयत्नशील बनावे, आळस सो़डून द्यावा, सकारात्मक विचार करावा, अशी अपेक्षा करायला काहीच हरकत नाही.
   रंजन केळकर

   Like

   • ओम वसुधालय ब्लॉग भेटी ३००,३८१ झाल्या आहेत.
    मी बरेच दिवस लिखाण केले नाही तरी एवढ्या भेटी होत आहेत.
    याचे मला भरभरून कौतुक व आनंद होत आहे.
    बरेच विषय लिहिले आहेत काय लिहावे समजत नाही साठी लिखाण थांबविले आहे.
    तरी वाचक ब्लॉग वाचन करतात याचे चं जास्त मला मनाला भावतं असो
    बाकि ठिक
    वसुधालय

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s