३० जुलै – कालमर्यादा

निसर्गाकडून काही जीवनावश्यक गोष्टी आपल्याला विनामूल्य मिळत असल्या तरी आपल्या गरजेच्या बहुतेक गोष्टी आपल्याला पैसा देऊन विकत घ्यायला लागतात. म्हणून पैसा कमावणे हे जीवनाचे एक ध्येय बनले आहे. पैसा कमावण्यासाठी माणसाची एकसारखी धडपड सुरू असल्याची आपल्याला दिसते. ह्या धडपडीमागचे कारण उघड आहे आणि ते हे की, पैसा कमावण्यासाठी आपल्याकडे मर्यादित वेळ आहे. त्यामुळे कमीत कमी वेळात जास्तीत जास्त पैसा कसा कमावता येईल ह्याचा विचार आपल्याला सतत करावा लागतो.

अनेक नैसर्गिक संसाधने आपल्याला पैसा देऊन विकत घेता येतात. जमीन, जमिनीखाली सापडणारी खनिजे, जमिनीवर उगवणारी पिके आपण विकत घेऊ शकतो. पण अशा कितीतरी गोष्टी आहेत ज्या आपल्याकडे पैसा असला तरी विकत घेता येत नाही. सुख, समाधान, शांती, आनंद, आरोग्य, आयुष्य ह्यासारख्या अतिशय महत्वाच्या गोष्टी कोणाला विकत घेता येत नाहीत. तसे शक्य असते तर सगळे श्रीमंत लोक सुखी, आनंदी आणि निरोगी राहिले असते. धनाढ्य लोक इतरांपेक्षा अधिक आयुष्य जगले असते. पण प्रत्यक्षात तसे होत असल्याचे आपल्याला दिसत नाही.

काळ, वेळ, समय कोणालाही विकत घेता येत नाहीत. जगातील सर्व लोकांसाठी दिवसात २४ तास असतात आणि वर्षात ३६५ दिवस, मग ते लोक गरीब असोत किंवा श्रीमंत. दिवसातले एखादे काम अपुरे राहिले तर ते संपवण्यासाठी कोणाला एक ज्यादा तास विकत घेता येत नाही. एखादा रेंगाळलेला प्रकल्प वेळेवर पूर्ण करण्यासाठी एक अधिक वर्ष विकत घेता येत नाही. माणसाच्या आयुष्याचेही तसेच आहे. ते पैसा देऊन वाढवता येत नाही. दीर्घायुष्य ही देवाची कृपा आहे ही जाणीव मनात बाळगून एक एक दिवस मोजत आपण चांगले जीवन जगण्याचा प्रयत्न केला पाहिजे. (स्तोत्र ९०:१२)

आपण आयुष्याचे दिवस मोजायचे एवढेच नाही, तर दिवसाचे ताससुद्धा मोजले पाहिजेत ह्याची स्वतः प्रभू येशूने आठवण करून दिलेली आहे. (योहान ११:९) दिवसाची कामे आपण प्रकाश असतानाच केली तर आपण अडखळणार नाही, असे तो म्हणाला होता. प्रभू येशू हा आपल्या जीवनाचा प्रकाश आहे. आपल्याला लाभलेला एक एक क्षण त्याच्या प्रकाशात आपण घालवला तर वेळ कमी पडत असल्याचे आपल्याला कधीच भासणार नाही.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

One thought on “३० जुलै – कालमर्यादा

  1. देव म्हणा येशू म्हणा ह्याचे नामस्मरण केंव्हा पण करता येते त्यासाठी प्रकाश च पाहिजे असे नाही रात्री झोपतांना नाम घेऊन नमस्कार करता येतो त्यांना तो पोहचतो व सकाळ चांगली उगवते

    Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s