५ जुलै – लहरी निसर्ग

सूर्योदय दररोज एका ठराविक वेळी होत नसतो. आज सहा वाजता, तर परवा सहा वाजून एका मिनिटाने, काही दिवसांनी सहा वाजून दोन मिनिटांनी, आणि काही महिन्यांनी कदाचित सात वाजता. तरी आपण सूर्याला लहरी म्हणत नाही, कारण सूर्योदयाच्या आणि सूर्यास्ताच्या वेळा आपल्याला नक्की माहीत असतात. सूर्य, चंद्र, ग्रह, तारे ह्या सगळ्यांचे मार्ग, त्यांची गती, त्यांच्यातले अंतर, सगळे काही नियमबद्ध असते. हे नियम आपण त्यांना लावून दिले आहेत का? अर्थातच नाही. एवढेच की, गुरुत्वाकर्षणाची आपल्याला इतकी सखोल माहिती झाली आहे की, ग्रह-ताऱ्यांच्या मार्गक्रमणाला आपण नियमांत बसवू शकतो.

ह्याउलट मॉन्सूनच्या आगमनाचे बघा. तो केरळवर सरासरी १ जूनला येतो, पण दर वर्षी ही तारीख वेगळी असते. कधी २५ मे तर कधी ७ जून. भारताच्या आतील प्रदेशात यायच्या त्याच्या तारखा तर खूपच बदलत राहतात. अनेक वर्षांच्या मॉन्सूनचा अभ्यास करूनही शास्त्रज्ञ त्या तारखांचे अचूक भाकीत करू शकत नाहीत. जेव्हा शास्त्रज्ञांना नैसर्गिक प्रक्रियांना आणि घटनांना नियमात बांधता येत नाही, तेव्हा निसर्ग लहरी आहे असे ते सांगून टाकतात.

रोजच्या जीवनात आपण अनुभवतो की, काही लोक मन मोकळे करून बोलतात आणि ते कसे वागतील ह्याची आपण कल्पना करू शकतो. पण काही लोक फारसे बोलत नाहीत, त्यांच्या मनात काय चालले आहे ते आपल्याला कळत नाही आणि आपल्या अपेक्षेनुसार ते करतील असे नाही. मग आपण म्हणतो की, ती व्यक्ती लहरी आहे. खरे तर तसे नसते, त्या व्यक्तीचा स्वभाव आपल्याला नीट समजलेला नसतो. निसर्गाचे तसेच आहे. आपण निसर्गाला जेव्हा लहरी म्हणतो, तेव्हा ते प्रत्यक्षात आपले अज्ञान असते. मग ते अज्ञान लपवण्यासाठी आपण वरुणराजा रुसला, बळीराजा सुखावला अशा प्रकारची भाषा बोलू लागतो.

आपण आज जी सृष्टी बघतो ती अस्तित्वात कशी आणि कधी आली ह्याविषयी शास्त्रज्ञ अविरत संशोधन करत आलेले आहेत. त्यांच्या ज्ञानात दररोज भर पडत आहे हे खरे असले तरी, कितीतरी गोष्टींविषयी त्यांचे अज्ञान आहे ह्याची जाणीवही वाढत चालली आहे. पवित्र शास्त्रात एक मूलभूत प्रश्न विचारला गेला आहे, तो हा की, परमेश्वराने सृष्टीची निर्मिती केली तेव्हा मानव कोठे होता? (इयोब ३८:४-३०) हा प्रश्न स्वतः परमेश्वराने विचारलेला आहे आणि त्याचे उत्तर मानवाला अजून सापडलेले नाही.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s