४ जुलै – उशीरा आलेला मॉन्सून

२०१४ आणि २०१५ सलग दोन वर्षे भारतावर मॉन्सूनचा पाऊस चांगला झाला नाही. अनेक प्रदेशांवर पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा खूपच कमी राहिले. महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात दुष्काळ पडला, शेतकऱ्यांचे इतके नुकसान झाले की, अनेकांनी निराश होऊन आत्महत्त्या केल्या. नद्या आटल्या, तळी रिकामी झाली, खेडोपाडी आणि मोठ्या शहरांतही पिण्याच्या पाण्याची मोठी समस्या निर्माण झाली.

म्हणून २०१६ च्या मॉन्सूनच्या आगमनावर सर्वांचे आतुरतेने लक्ष लागले होते. मॉन्सून नेहमीपेक्षा उशीरा आल्यामुळे लोकांच्या चिंतेत अधिकच भर पडली. वृत्तपत्रांत आणि टी.व्ही.वर एकसारखी दुष्काळाविषयी चर्चा केली जात होती आणि दारुण परिस्थितीची दृश्ये दाखवली जात होती.

पण उशीरा का होईना मॉन्सून आला, आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीस सर्वदूर पाऊस पडला. नद्या पुन्हा वाहू लागल्या, धरणांतील साठे वाढले, शेतकरी पेरण्या करू लागले. शहरातले रहिवासी पावसात भिजायची मजा लुटायला डोंगर-दऱ्यांत जाऊ लागले. पर्यटकांच्या गर्दीमुळे रस्ते जाम झाले.

अजून मॉन्सूनचे तीन महिने जायचे आहेत. पण तीन दिवसांत सगळे काही बदलले आहे. “दुष्काळ! दुष्काळ!” म्हणणारा मीडिया आता “पाणी! पाणी!” म्हणू लागला आहे.

मानवी दुःख किती तात्कालिक असते! आपत्ती येतात तेव्हा जीवन नकोसे होते. फक्त आपल्यावरच अन्याय झालेला आहे, सगळे दुःख आपल्याच वाट्याला आलेले आहे, आणि आपण संकटात असताना परमेश्वर आपली काळजी करत नाही, असे वाटू लागते. पण कुठे तरी एक आशेचा किरण दिसतो, आणि मग अचानक परिस्थिती बदलते. दुःखाचा विसर पडतो. खरे म्हणजे परमेश्वर आपल्याला सोडून गेलेला नसतो, तो आपल्यासाठी काही तरी करत असतोच.

संत पौलाने त्याच्यावर आलेल्या संकटांचे आणि त्याने सोसलेल्या छळाचे वर्णन त्याच्या पत्रांत केलेले असले, तरी ते सोसत असताना तो खचून गेलेला नव्हता. तो तर आपल्या सर्वांना हा बोध करतो की, सार्वकालिक जीवनात आपल्यासाठी राखून ठेवलेले गौरव इतके माठे आहे की, त्याच्या तुलनेत पृथ्वीवरचे सर्व दुःख काहीच नाही. आपल्याला दिसणार्‍या गोष्टी क्षणिक आणि तात्कालिक आहेत पण न दिसणार्‍या गोष्टी सार्वकालिक आहेत. (२ करिंथ ४:१-१८) त्या डोळ्यांपुढे ठेवून आपण जीवन जगले पाहिजे.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s