२९ जून – मागा आणि तुम्हाला मिळेल

वैशालीची गोष्ट आता सर्वांना माहीत झाली आहे. सहा वर्षांच्या ह्या मुलीला हृदयाच्या शस्त्रक्रियेची गरज होती जी करून घेणे तिच्या कुटुंबाला शक्य नव्हते. वैशालीने थेट नरेन्द्र मोदींना पत्र लिहिले आणि त्यांना आपली व्यथा सांगितली. तिच्या पत्राची त्यांनी दखल घेतली, सरकारी यंत्रणा कामाला लावली, वैशालीवर यशस्वी शस्त्रक्रिया केली गेली आणि प्रधान मंत्री नुकतेच पुण्यात आले असताना ते तिला भेटलेसुद्धा!

अशीच एक घटना मी शाळेत होतो तेव्हाची आहे. त्या काळी एस.एस.सी. बोर्डाच्या म्हणजे अकरावीच्या परीक्षेला बसण्यासाठी फॉर्म भरताना त्याबरोबर वीस रुपये शुल्क द्यावे लागायचे. एका विद्यार्थ्याकडे तेवढे पैसे नव्हते आणि शाळेने त्याचा फॉर्म पुढे पाठवला नाही. त्याचे एक वर्ष वाया जाईल हे जाणूनदेखील. त्या मुलाने एक पोस्टकार्ड घेतले आणि सरळ चाचा नेहरूंच्या नावाने पाठवून दिले. ते कार्ड त्यांना मिळाले एवढेच नाही, तर काही दिवसांतच शिक्षण अधिकारी वीस रुपये घेऊन शाळेत आले!

दोन हजार वर्षांपूर्वी प्रभू येशू म्हणाला होता की, “मागा, आणि ते तुम्हाला दिलं जाईल…कारण जो कोणी मागतो त्याला मिळतं…” (मत्तय ७:७-८) आजच्या युगातही हे किती खरे आहे. पण विचार करा की, सगळीच लहान मुले आपआपल्या विनंत्या पाठवायला लागली तर त्या मान्य होतील का? आणखी थोडा विचार करा की, सगळ्या लोकांनी त्यांना पाहिजे असलेले सर्व काही देवाकडे मागितले तर त्यांना ते खरोखर मिळेल का?

पण हे प्रश्न तात्विक आहेत आणि प्रत्यक्ष जगात ते उद्भवत नाहीत, कारण बहुतेक लोक मुळात काही मागतच नाहीत. याकोब त्याच्या पत्रात हेच म्हणतो की, “तुम्हाला मिळत नाही, कारण तुम्ही मागत नाही.” (याकोब ४:२-३) याकोब हेही स्पष्ट करतो की, अनेकदा आपण मागितलेले आपल्याला मिळत नाही कारण ते मिळेल असा आपल्यात विश्वास नसतो किंवा ते मागण्यामागचा आपला हेतू प्रामाणिक नसतो. (याकोब १:५-८)

आपण देवाकडून काही मागतो तेव्हा आपला विश्वास आणि आपला हेतू महत्वाचा ठरतो.

(डॉ. रंजन केळकर)

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google+ photo

You are commenting using your Google+ account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

w

Connecting to %s