२७ जून – देवाच्या जवळ

याकोबाच्या पत्रात लिहिले आहे की, “तुम्ही देवाच्या जवळ जा आणि तो तुमच्या जवळ येईल.” (याकोब ४:८) पण देव तर नेहमीच आपल्या जवळ असतो. त्याने आपल्याला हे आश्वासन दिले आहे की, “मी तुला कधी टाकणार नाही किंवा सोडणार नाही.” (इब्री १३:५) तरीपण देवाला बघण्याची क्षमता आपल्या डोळ्यांत नाही आणि म्हणून तो अगदी जवळ असूनसुद्धा आपल्याला दिसत नाही. मग देवाच्या आणखी जवळ जायचे ते कसे?

एक तर देवाविषयी विचार करायचा. आजच्या ह्या द्रुतगती जीवनात देवासाठी वेळ काढायचा. आपल्या दैनंदिन व्यवहारात त्याची आठवण करायची. आपण संपूर्णपणे स्वावलंबी व स्वतंत्र आहोत की, देव आपले व्यवहार व आचरण बघत असेल आणि त्याला काय वाटत असेल ह्याविषयी विचार करायचा.

दुसरे म्हणजे देवाची प्रार्थना करायची. आपण जेव्हा देवाची प्रार्थना करतो तेव्हा आपण त्याच्या अधिक जवळ जातो. त्याचे सान्निध्य आपल्याला जाणवू लागते. तो कोणत्याही परिस्थितीत आपल्याला मदत करायला समर्थ आहे असा विश्वास वाढू लागतो. आपल्या प्रार्थनेचे परिणाम आपण अनुभवू लागतो.

त्याशिवाय आपण देवाची नियमितपणे उपासना करायची. वैयक्तिक प्रार्थना आणि सामूहिक उपासना ह्यात फरक आहे. प्रभू येशू म्हणाला होता की, “दोघे किंवा तिघे जिथं माझ्या नावानं जमले आहेत तिथं त्यांच्यात मी आहे.” (मत्तय १८:२०) उपासनामंदिरात देवाच्या उपस्थितीची आपल्याला जाणीव झाल्यावाचून राहत नाही.

आणखी हे की, पवित्र शास्त्राचे वाचन करायचे आणि त्यावर चिंतन करायचे. देवाविषयी आपल्या मनात असलेल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे त्यात सापडतात. देवाचे वचन आपल्याला जितके जास्त समजू लागते, तितका देव आपल्या अधिक जवळ येऊ लागतो.

पवित्र शास्त्र आपल्याला सावध करते की, आपण उशीर करू नये. असे न होवो की, आपण देवाच्या जवळ जायचा प्रयत्न करू आणि तो दूर निघून गेलेला असेल. (यशया ५५:६)

(डॉ. रंजन केळकर)

 

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s