१० फेब्रुवारी – प्रवेश खुला

“प्रवेश बंद” किंवा “प्रवेश निर्बंधित” किंवा “येथून पुढे जाण्यास मनाई आहे” असे सांगणारे फलक सरकारी तसेच खाजगी मालकीच्या इमारतींच्या समोर, रस्त्यांवर, हॉस्पिटलच्या आय.सी.यू. च्या दरवाजांवर, किती तरी ठिकाणी असतात. पुष्कळदा लोक त्यांच्याकडे फारसे लक्षही देत नाहीत. नवल म्हणजे जेथे देवाची उपासना होते तेथेसुद्धा कधी कधी “प्रवेश बंद” ची पाटी पहायला मिळते. ह्या संदर्भात देवासमोर जायचा सर्वांना हक्क आहे आणि त्या हक्कावर कोणी मर्यादा घालू शकतात का ह्याविषयी हल्ली खूप चर्चा सुरू आहे, आणि आंदोलने पण होत आहेत.

पवित्र शास्त्रात हे अगदी स्पष्ट लिहिले आहे की, ज्या परमेश्वराने आकाश व पृथ्वी निर्माण केली तो मानवी हातांनी बांधलेल्या मंदिरात रहात नाही. (प्रे.कृ. ७:४८-५०, १७:२४, यशया ६६:१) परमेश्वराचे खरे मंदिर तर आपणच आहोत कारण त्याचा आत्मा आपल्यात राहतो. (१ करिंथ ३:१६) म्हणून मंदिरात जायची धडपड करताना आपण आपल्या अंतःकरणावर “प्रवेश बंद” ची पाटी तर लावलेली नाही आणि परमेश्वराला बाहेर तर उभे केले नाही हेही बघितले पाहिजे.

पवित्र शास्त्रात असेही लिहिले आहे की, देवाजवळ पक्षपात नाही. (रोम २:११) प्रभू येशू म्हणाला होता की, तो वाइटांवर आणि चांगल्यांवरही आपला सूर्य उदयास आणतो, तसाच तो नीतिमानांवर आणि अनीतिमानांवरही पाऊस पाडतो.  (मत्तय ५:४५)

वर्तमान वादविवादाच्या संदर्भात संत पौलाचे शब्द आपण आठवले पाहिजेत. त्याने लिहिले आहे की, ख्रिस्त येशूवरील विश्वासाद्वारे आपण सर्व देवाची मुले आहोत. कारण जितक्यांनी ख्रिस्तात बाप्तिस्मा घेतला आहे तितक्यांनी ख्रिस्त परिधान केला आहे. ख्रिस्त येशूमध्ये आपण सर्व एक आहोत. यहुदी किंवा हेल्लेणी, दास किंवा स्वतंत्र, पुरुष किंवा स्त्री, असा येथे कोणताच भेदभाव नाही. (गलती ३:२६-२९)

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

2 thoughts on “१० फेब्रुवारी – प्रवेश खुला

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s