२६ जानेवारी – सुवार्ता

http://www.facebook.com/MarathiBible ह्या माझ्या फेसबुक पेजवर एका वाचकाने विनंती केली की, सुवार्ता आणि ती कशी सांगावी ह्याविषयी मी लिहावे.

आजच्या भाषेत बोलायचे तर सुवार्ता ही एक ब्रेकिंग न्यूज आहे. ती ही की, मानवाला मुक्ती देण्यासाठी देवाने त्याचा पुत्र जगात पाठवला. त्याच्यावर विश्वास ठेवणाऱ्याला तारणाचा मार्ग खुला झाला. येशूच्या द्वारे मानवाला पापांची क्षमा लाभली आणि अनंतकालीन जीवन मिळाले. प्रभू येशूचा जन्म, आणि त्याचे जीवन, मरण आणि पुनरुत्थान ह्यांतून देवाची प्रीती, दया आणि कृपा प्रकट झाली.

सुवार्ता एक तत्त्वज्ञान नाही. ती एक विचारधारा नाही. ती एक संशोधनाचा विषय नाही. सुवार्ता एक अनुभव आहे. देवाच्या प्रीतीचा अनुभव, त्याच्या दयेचा अनुभव, त्याच्या कृपेचा अनुभव, तारणप्राप्तीचा अनुभव. अंधारात असताना प्रकाश दिसणे, नैराश्यात असताना देवाचा सहवास मिळणे, एकटे असताना येशूची मैत्री लाभणे, वाट चुकलेली असताना पवित्र आत्म्याचे मार्गदर्शन मिळणे हे सर्व ख्रिस्ती जीवनातील अनुभव आहेत.

म्हणून सुवार्ता सांगणे म्हणजे पवित्र शास्त्रातील वचनांची जाहिरातबाजी करणे असे नाही, किंवा तारणाच्या प्रक्रियेविषयी उच्च वैचारिक पातळीवर चर्चा करणे असेही नाही. सुवार्ता सांगणे म्हणजे परमेश्वराविषयीचे, येशूविषयीचे आपल्याला आलेले गोड आणि सुंदर अनुभव इतरांना सांगणे.

प्रभू येशूने एका माणसाला त्याच्या व्याधीपासून मुक्त केले होते. त्याला येशूने म्हटले, “तू आपल्या घरी, आपल्या लोकांकडे जा, आणि प्रभूनं तुझ्यासाठी किती मोठ्या गोष्टी करून तुझ्यावर दया केली आहे ते त्यांना सांग.” (मार्क ५:१९)

देवाने आपल्यासाठी काही केले आहे असे जर आपल्याला वाटत असेल तरच आपण ते इतरांना सांगू शकू. आपले तारण झाले आहे असा आपला विश्वास असेल तरच आपण त्याविषयी इतरांना सांगू शकू. खरे तर आपली रोजची जीवनशैलीच सुवार्ता सांगण्याचे एक साधन होऊ शकेल.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s