७ जानेवारी – देवाचे सर्व उपकार

आपल्या बॅंक खात्यात नियमितपणे जमा होणाऱ्या पगाराशिवाय अनेक रकमा वेळोवेळी आपोआप जमा होत राहतात, उदाहरणार्थ, गॅस सिलिंडरची सबसिडी, मुदत ठेवींवरचे व्याज, गुंतवणुकींवरची मिळकत, आयकराचा रिफंड, इत्यादी. त्यासाठी आपल्याला काही करावे लागत नाही. कधी कधी तर त्याची आपल्याला माहितीसुद्धा नसते.

आशाच प्रकारे आपल्यावर देवाची कृपा होत राहते आणि तिची आपल्याला जाणीवही नसते. म्हणून स्तोत्र १०३ च्या सुरुवातीला दावीद स्वतःच्या जिवाला सांगतो, “हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, हे माझ्या सर्व अंतर्यामा, त्याच्या पवित्र नामाचा धन्यवाद कर. हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.”

आपण विसरलेले उपकार कोणते असू शकतील त्याची आठवण दावीद त्याच्या स्तोत्रात पुढे करून देतो. परमेश्वर आपल्या सर्व अपराधांची क्षमा करतो. तो आपले सगळे रोग आणि आजार बरे करतो. तो आपल्या जिवाचा उद्धार करतो. तो आपल्याला उत्तम गोष्टींनी तृप्त करतो. तो आपले तारुण्य गरुडासारखे नवे बनवतो.

पण देवाने आपल्यावर केलेले उपकार विसरणे किती सोपे आहे ना? आपल्या जीवनात घडणाऱ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आपण स्वबळावर कमावलेल्या आहेत असे आपल्याला वाटते का? त्या आपल्या हक्काच्या होत्या आणि म्हणून त्या मिळाल्या असे वाटते का?

याकोबाने त्याच्या पत्रात लिहिले आहे की, प्रत्येक चांगली गोष्ट वरून, म्हणजे आपल्या स्वर्गातील पित्याकडून आपल्याला मिळते. (याकोब १:१७)

“हे माझ्या जिवा, परमेश्वराचा धन्यवाद कर, आणि त्याचे सर्व उपकार विसरू नकोस.” दाविदाप्रमाणे आपणही स्वतःला देवाच्या उपकारांची आठवण वेळोवेळी करून दिली पाहिजे.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s