५ जानेवारी – नवीन गीत

आजच्या विश्वात दर रोज नवनवीन गीते रचली जातात, गाइली जातात. जुनी गीते नवीन प्रकारे प्रस्तुत केली जातात. मिक्स, रीमिक्स, अनप्लग्ड, कव्हर व्हर्जन, कराओके, अशा वेगवेगळ्या स्वरूपात यूट्यूबवर गाणी अपलोड होत राहतात. किती तरी टीव्ही चॅनल्सवर रात्रंदिवस गाणी प्रसारित केली जातात. नवीन गीते लोकप्रियतेत वाढतात, मग मागे पडतात, आणि दुसरी नवीन गीते त्यांची जागा घेतात.

भारतीय चित्रपटांत भावना व्यक्त करण्यासाठी गीतांचा भरपूर उपयोग केला जातो. काही गाणी इतकी मोहक असतात की, ती आपण स्वतः गुणगुणू लागतो, त्यांच्या तालावर नाचतो. काही गाणी तर आपण आयुष्यभर विसरत नाही.

आपल्या जीवनात भावगीतांप्रमाणे भक्तिगीतेही महत्त्वाची आहेत. देवाविषयीच्या आपल्या भावना गीतांद्वारे व्यक्त करणे ही एक चांगली गोष्ट आहे. पण फक्त आपण पाठ केलेले प्राचीन मंत्र त्याच्यासाठी म्हटले पाहिजेत असे मात्र नाही. पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी लिहिलेले आहे की, आपण परमेश्वरासाठी एक नवीन गीत गाइले पाहिजे. (स्तोत्र ३३:३, ४०:३-४, ९६:१, ९८:१, १४९:१, यशया ४२:१०)

परमेश्वराने आपल्यासाठी अद्भुत कुत्ये केली आहोत, त्याने आपले तारण केले आहे, असा जर आपला अनुभव असेल, तर आपल्या मुखात सदैव एक नवे गीत राहील. आपण वाद्ये वाजवीत, जयघोष करीत, त्याच्या स्तुतीचे एक नवीन गीत नेहमी गात राहू.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s