६ डिसेंबर – भूतकाळाचे ओझे

शाळेला जाणाऱ्या मुलामुलींच्या दप्तराचे वजन किती असावे ह्यावर हल्ली खूप चर्चा होत आहे. त्यात पुस्तके किती असावीत, वह्या किती असाव्यात ह्यावर संशोधन सुरू आहे. तरुणतरुणी घराबाहेर पडताना बहुतेक बॅकपॅक बरोबर घेऊनच निघतात कारण बाइकवर बसताना ते सोयीचे असते. त्यात पुस्तके नसली तरी लॅपटॉप, टॅबलेट, चार्जर, हेडफोन्स, पेन ड्राइव्ह, अशा किती तरी गोष्टी ठेवलेल्या असतात. सीनियर सिटिझन त्यांच्याबरोबर एखादी पिशवी बाळगतात ज्यात ते चष्मा, वर्तमानपत्र, औषधे ह्यासारख्या वस्तू ठेवतात.

पण असंख्य लोक एक निराळ्या प्रकारचे ओझे घेऊन फिरत असतात आणि ते म्हणजे भूतकाळाचे ओझे. जुन्या सवयी सुटत नाहीत आणि बदलत्या परिस्थितीत त्रासदायक बनतात. जुन्या आठवणी मनातून जाता जात नाहीत. जुनी पापे, जुने अपराध, अंतःकरणाला बोचत राहतात. भूतकाळाचे हे ओझे कितीही जड झाले तरी ते पाठीवरून उतरून खाली ठेवताच येत नाही.

भूतकाळाचे ओझे कमी करण्यासाठी दोन उपाय पवित्र शास्त्रात सांगितलेले आहेत. प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला होता, “अहो तुम्ही कष्ट करणारे आणि ओझ्याखाली दडपलेले, तुम्ही सर्व माझ्याकडे या आणि मी तुम्हाला विसावा देईन. माझं जू आपल्यावर घ्या आणि माझ्याकडून शिका. कारण मी मनाचा सौम्य आणि लीन आहे; आणि तुम्ही आपल्या जिवासाठी विसावा मिळवाल. कारण माझं जू सोयीचं आहे आणि माझं ओझं हलकं आहे.” (मत्तय ११:२८-३०) प्रभू येशू आपले भूतकाळाचे ओझे हलके करण्यास समर्थ आहे. तो आपली पापे, अपराध, चुका, पदरी घेण्यास, आपली क्षमा करण्यास समर्थ आहे. आपला भूतकाळ विसरून तो आपल्याला उज्वल भविष्याकडे नेण्यास समर्थ आहे.

आपण संत पौलाचे अनुकरण केले पाहिजे. तो म्हणाला होता, “बंधूंनो, मी हीच एक गोष्ट करतो की, मागील गोष्टी विसरून जाऊन आणि पुढील गोष्टींवर लक्ष लावून, ख्रिस्त येशूच्या द्वारे झालेल्या, देवाच्या वरच्या पाचारणाच्या बक्षिसासाठी मी पुढच्या मर्यादेवरील खुणेकडे धावतो.” (फिलिपै ३:१३-१४)

एकदा आपण आपल्या जीवनाचे ध्येय निश्चित केले की, भूतकाळाला महत्त्व उरत नाही.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

One thought on “६ डिसेंबर – भूतकाळाचे ओझे

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s