२३ नोव्हेंबर – एकटेपणा

पूर्वीच्या काळी समाजात एकत्र कुटुंब पद्धती होती. तीन-चार पिढ्यांचे लोक एकाच घरात राहत असत. कुटुंबातील सर्व लोक एकमेकांची काळजी घेत. अनाथ, अपंग, असहाय सदस्यांची जबाबदारी सबंध कुटुंब घेत असे. कालांतराने एकत्र कुटुंबांच्या जागी छोटी कुटुंबे आली. नंतर समाजातील अनेक प्रकारच्या व्यक्तींना स्वतंत्रपणे राहावासे वाटू लागले किंवा तशी त्यांना गरज पडू लागली. त्याबरोबरच लोकांत एकटेपणा आला आणि तो आता वाढत चालला आहे.

हल्ली तर लोक जेथे काम करतात तेथेही एकटेपणा जाणवतो. काही कार्यालयात अगदी थोडे कर्मचारी असतात जे आपआपल्या कामात मग्न असतात. त्यांचा इतरांशी संबंधसुद्धा येत नाही. घरी आणि कामाच्या जागी दोन्हीकडे जर एकटेपणा वाढला तर मग जीवन निरस भासू लागते. आधी टेन्शन येते, मग डिप्रेशन वाटायला लागते, मग नकारात्मक विचारांनी मन भरून जाते.

पण परिस्थिती अशी हाताबाहेर जाऊ न देण्यासाठी प्रयत्न करणे हे प्रत्येकाच्या हातात आहे. ज्या लोकांचा प्रभू येशूवर विश्वास आहे त्यांना तर कधी एकटे वाटायचे कारणच उद्भवू नये.
परमेश्वर त्याच्या लोकांना कधीही एकटे सोडणार नाही, तो त्यांना कधीही अंतर देणार नाही, हे त्याचे वचन आहे. पवित्र शास्त्रात किती तरी ठिकाणी हे वचन आपल्याला वाचायला मिळते. (अनुवाद ३१:८, यहोशवा १:५, यशया ४१:१०, ४३:२, यिर्मया १:८, इब्री १३:५)

प्रभू येशूचे पृथ्वीवरील शेवटचे शब्द होते की, “पहा, मी तुमच्याबरोबर, सर्व दिवस, युगाच्या समाप्तीपर्यंत आहे.” (मत्तय २८:२०)

पण येशूने त्याच्या शिष्यांचा शेवटचा निरोप घेतला त्याआधी त्याने त्यांना सांगितले होते की, त्यांनी अस्वस्थ होऊ नये कारण तो त्यांना कधीच अनाथ सोडणार नाही. तो त्यांना म्हणाला होता की, पिता त्यांच्यासाठी पवित्र आत्मा पाठवील, जो सर्वकाळ त्यांच्याबरोबर राहील. येशूने असेही म्हटले की, “कोणीही माझ्यावर प्रीती करील तर तो माझं वचन पाळील; आणि त्याच्यावर माझा पिता प्रीती करील; आणि आम्ही त्याच्याकडे येऊ, आणि त्याच्याकडे आमचं वसतीचं ठिकाण करू.” (योहान १४:१६-२६)

पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा कायमचे आपल्याबरोबर असताना आपल्याला कोणत्याही परिस्थितीत एकटे वाटण्याचे काहीही कारण असू शकत नाही.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s