११ ऑक्टोबर – देवदूत

पवित्र शास्त्रात अनेक ठिकाणी, जुन्या तसेच नव्या करारात, आपण देवदूतांविषयी वाचतो. देवाचे पवित्र देवदूत त्याच्यासाठी अनेक प्रकारची कामे करतात. ते त्याचे संदेश मानवापर्यंत पोहचवतात. देवाच्या वतीने ते विशिष्ट व्यक्तींची भेट घेतात आणि त्यांना देवाचा निरोप देतात. नीतिमान लोकांचे ते संरक्षण करतात आणि संकटात त्यांना शक्ती पुरवतात. देवाने त्याच्या भक्तांच्या प्रार्थनेला दिलेले उत्तर तातडीने घेऊन जाण्याचे काम देवदूत करतात.

पवित्र शास्त्रात केलेल्या वर्णनानुसार देवदूत लोकांना दिसायचे आणि ते लोकांबरोबर संभाषणसुद्धा करायचे. आजच्या काळात तसे होत नसले तरी त्याचा अर्थ हा नाही की, आता देवदूत राहिलेले नाहीत. देवदूत आजसुद्धा आहेत, पण ते लगेच आपल्याला ओळखू येत नाहीत. अनेकदा आपल्या रोजच्या जीवनात आपण अनुभवतो की, एखाद्या अनोळखी व्यक्तीकडून अचानक आपल्याला मदत मिळते. किंवा एखाद्या कठीण प्रसंगी आपल्याला धैर्य मिळते. किंवा आपल्याला काही सुचेनासे झाले असताना आपल्याला चांगले मार्गदर्शन मिळते. ह्या सर्वाच्यामागे देवाचा हात असतो आणि त्याच्या आदेशावरून देवदूत आपली मदत करत असतात. म्हणून आपण विशेष लक्ष दिले पाहिजे. इब्री लोकांस पत्राच्या लेखकाने बोध केला आहे की, “आतिथ्यप्रेम विसरू नका, कारण त्यामुळे कित्येकांनी नकळत देवदूतांचे आतिथ्य केले आहे.” (इब्री. १३:२)

पण आज आपल्याला देवदूत दिसत नाहीत ह्या परिस्थितीचा फायदा सैतान घेत आहे. संत पौलाने आपल्याला इशारा दिला आहे की, “खोटे प्रेषित आणि फसवे कामकरी आता ख्रिस्ताच्या प्रेषितांचे रूप घेत आहेत. आणि ह्यात आश्चर्य नाही, कारण स्वतः सैतानाने प्रकाशाच्या देवदूताचे रूप घेतले आहे.” (२ करिंथ ११:१३-१४) विचार करा की, स्वतः अंधाराचा अधिपती प्रकाशाचे पांघरूण घेऊन पृथ्वीवर आपल्यामध्ये वावरू लागला तर आपली केवढी मोठी फसवणूक तो करू शकेल? म्हणून आपण सावध राहण्याची आणि देवाने आपल्याला दिलेली विवेकबुद्धी वापरण्याची आज नितांत गरज आहे.

प्रभू येशूने स्वतःच आपल्याला सांगितले आहे की, “खोट्या संदेष्ट्यांविषयी जपा, ते मेंढरांच्या वेशात तुमच्याकडे येतात, पण आतून ते धरणारे लांडगे आहेत. तुम्ही त्यांच्या फळांवरून त्यांना ओळखाल.” (मत्तय ७:१५-१६) “तेव्हा जर कोणी तुम्हाला म्हणेल, ‘बघा, ख्रिस्त इथं आहे’ किंवा ‘तिथं आहे’ तर तुम्ही विश्वास ठेवू नका. कारण खोटे ख्रिस्त आणि खोटे संदेष्टे उपस्थित होतील, आणि अशी महान चिन्हं आणि अद्भुतं दाखवतील की, निवडलेल्यांनापण, शक्य तर फसवतील.” (मत्तय २४:२३-२४)

खोटे संदेष्टे आपण कसे ओळखायचे हे संत योहानानेही सांगितले आहे. प्रत्येक आत्म्यावर आपण विश्वास ठेवू नये, पण तो खरोखर देवाकडून आहे का ह्याची आपण पारख करावी. कारण प्रत्येक आत्मा देवाकडून नाही. आपल्यात जो आत्मा आहे तो देवाला ओळखतो आणि तो आपले ऐकतो. पण जो आत्मा देवाला ओळखीत नाही तो आपले ऐकत नाही. ह्यावरून सत्याचा आत्मा आणि संभ्रमाचा आत्मा ह्यामधील फरक आपल्याला समजेल. (१ योहान ४:१-६)

आजच्या जगात अतिशुभ्र वस्त्रे परिधान केलेले आणि देवदूतांसारखे दिसणारे किती तरी लोक वावरत असतात. काही संदेष्ट्यांचे तत्त्वज्ञान ऐकायला हजारोंच्या संख्येने भक्तगण उपस्थित राहतात. काही साधुसाध्वींच्या तालावर त्यांचे शिष्य त्यांच्याबरोबर नाचायला तयार असतात. काही भविष्यवादी लोकांचे भविष्य चागले जावे म्हणून त्यांनी कोणत्या खड्यांची आंगठी घालावी किंवा कोणत्या रंगाचे कपडे घालावेत किंवा घराची पुनर्मांडणी कशी करावी हे सांगतात.

आजच्या जगात आपण सावधगिरी बाळगली पाहिजे आणि स्वतःला जपले पाहिजे.

संत पौलाने स्पष्ट शब्दांत सागितले आहे की, ख्रिस्ताच्या सुवार्तेशिवाय दुसरी कोणतीही सुवार्ता नाही. आपण खोट्या सुवार्तेवर विश्वास ठेवू नये, मग ती एखाद्या देवदूताने सांगितली असली तरी…! (गलती १:१-१०)

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

5 thoughts on “११ ऑक्टोबर – देवदूत

 1. ॐ नमस्कार !वाटतं जग सुधारल फोन इंटरनेट मूळे सर्व लगेच समजते तसे नाही हि नुसती यंत्र आहेत कित्येक वेळेला बंद पडतात भेटू म्हटलं तरी फोन लागत नाही माझा चुलत भाऊ कोल्हापूर येथे आले आधी फोन चालू झाला देवीच्या देऊळ मध्ये भेटायचे मी सांगतो मी परत्फोन ची वाट पाहत बसले तर काही दिवस नंतर समजले कि त्याचा फोन पाण्यात पडला तो मला फोन करू शकला नाही व भेट व्हावयाची राहिली काही वेळेला मन असल कि सहज व्यक्ती भेटते. मानसिक तयारी व ईच्छा शक्ती असेल तर च व्यक्ती किंवा प्रगती होते. माझ्या अनुभव वरून सांगते. माझे भाजी विद्दाधर चिवटे पुण्यात असतात त्यांच्या कडे मी जात असते आपणास मी पुण्यात आले कि भेटेन विद्दाधर चिवटे हवामान खातपुण्यात मध्ये सर्विस ला होते आता रिटायर्ड व पेंसन चालू आहे त्यांना.

  Like

  • बघा, काय योगोयोग…श्री चिवटे माझे निकट सहकारी होते आणि ते ठीक आहेत हे ऐकून बरे वाटले. त्यांना माझं विचारणं सांगा.
   रंजन केळकर

   Like

   • ॐ नमस्कार याला योगायग नसून मन म्हणतात. सहज भेटू साठी मी विद्दाधर भाऊजी बद्दल लिहिले आणि आपले मित्र आहेत व आपण त्यांची ओळख दाखविली तं ! कधी असे वाटले का आपल्याला आपला मित्र असा भेटेल व त्याची खुशाली त्याची भावजय देते. याला ऋणानबंधन व एक प्रकारे मन आहे

    Like

 2. ॐ नमस्कार ! पूर्वी मला एखाद्दा ची आठवण आली कि तो भेटत असे किंवा त्याची काहीतरी खुशाली कळत असे असे होत असे पण आता तसे होत नाही माझी शक्ती कमी झाली वाटत मला वाटत असे देवा ने आमच्या श्री गोंदवलेकर महाराज यांनी माणूस पाठवून मला सर्व माहिती दिली असे वाटत असे आता असे का होत नाही देव तर आहे तेथे च आहे.

  Like

  • प्रिय वसुधाताई,
   तुमच्या ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्यासारखा माणूस काय देणार? पण मला हे खरं वाटत नाही की, तुमची शक्ती काही कमी झाली आहे. उलट आजच्या मोबाइल आणि इंटरनेटच्या युगात तर हे जास्तच सोपं होऊ लागलं आहे. अनेकदा असं होतं की, माझ्या मनात कोणाविषयी सारखे विचार येत राहतात आणि थोड्याच वेळात त्याचा फोन येतो. मी म्हणेन की, कोणाची आठवण येत असेल किंवा त्याच्याविषयी काही बरेवाईट विचार येत असतील किंवा स्वप्नं पडत असतील, तर त्या व्यक्तीसाठी देवाकडे प्रार्थना करायची की, देवाने त्याला सुरक्षित राखावे आणि देवाचे कृपाछत्र त्याच्यावर राहावे. प्रार्थनेचं उत्तर जरूर मिळेल.
   वसुधाताई, मी पुण्यात राहतो. आपण पुण्याला कधी येणार असाल तर मला सांगा. मला आपली भेट घ्यायला आवडेल.
   कळावे,
   रंजन केळकर

   Like

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s