८ ऑगस्ट – और दिखाओ

आपले जीवन अपूर्ण आहे, त्यात काही तरी कमी आहे, असे आपल्याला सारखे वाटत असते. मग जीवनात काय कमी आहे ह्यावर आपण विचार करू लागतो आणि ते मिळवण्यासाठी धडपड करू लागतो. ह्या अपूर्ण जीवनाच्या सिद्धान्तावर ग्राहकवाद आधारलेला आहे. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी ही पूर्वीची कल्पना आता फारशी उरलेली नाही. आपल्याला सारख्या नवनवीन गोष्टी विकत घ्यायला लावणे आणि त्या विकत घ्यायची आपली ऐपत नसली तर ती आपल्याला निर्माण करायला लावणे ह्यातच ग्राहकवाद आहे.

पूर्वीच्या काळी आपल्या खरेदीसाठी बाजारात जावे लागायचे किंवा एखाद-दुसरा फेरीवाला घरी यायचा. पण आता बाजारपेठेचे स्वरूप पालटून गेले आहे. मोठमोठ्या मॉलमध्ये हजारो गोष्टी आपल्यासमोर मांडलेल्या असतात. तेथे एक सेल संपला की, काही दिवसांतच दुसरा सेल सुरू होतो. आपण नुकतीच खरेदी केलेली वस्तू आता जुनी झाली आहे असे आपल्याला भासवले जाते आणि नवीन वस्तू खरेदी करायला आमीष दाखवले जाते.

अलीकडच्या काळात तर घर बसल्या खरेदी करायची नवीन सोय इंटरनेटमुळे उपलब्ध झाली आहे. अनेक साइट आता खरेदीविक्रीच्या धंद्यात उतरल्या आहेत आणि त्यांच्यांत स्पर्धा सुरू झाली आहे. कोथिंबीरीपासून ते डायनिंग टेबलपर्यंत, कुदळीपासून ते बंगल्यापर्यंत, अगदी काहीही, आपण आहोत तेथून, पैसे असोत-नसोत, विकत घेऊन टाकू शकतो. इंटरनेटच्या माध्यमाद्वारे, लाखो वस्तू असलेली बाजारपेठ जणू आपल्या घरी चालून आली आहे. आणि त्यांतूनसुद्धा आपल्याला काहीच पसंद पडले नाही, तर आपण म्हणू शकतो, “और दिखाओ”!

प्रभू येशू म्हणाला होता की, “सर्व प्रकारच्या लोभांपासून सावध रहा, कारण मनुष्याचं जीवन हे त्याच्या मालमत्तेच्या विपुलतेत नाही.” (लूक १२:१५) आपल्या जीवनात खरी कमतरता कशाची आहे ह्यावर विचार करणे आवश्यक आहे. आरोग्य, आनंद, समाधान, शांती, प्रेम, सुज्ञान, अशा किती तरी गोष्टी आपल्याला बाजारातून विकत घेता येत नाहीत. त्या आपल्याला पाहिजे असतील तर आपण त्या देवाकडून मागाव्यात आणि तो त्या देईल.

(डॉ. रंजन केळकर)

 

 

 

Advertisements

One thought on “८ ऑगस्ट – और दिखाओ

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s