३ जुलै – देवाच्या वचनाची आठवण

एखादे गाणे नुसते गुणगुणणे आणि त्यातील भावना व्यक्त करून ते गाणे ह्यात मोठा फरक असतो. घरकाम करत असताना टी.व्ही. चालू ठेवणे आणि त्याच्यासमोर बसून क्रिकेटचा सामना पाहणे ह्यात फरक असतो. त्याचप्रमाणे, पवित्र शास्त्रातील काही पाने नजरेखालून घालणे निराळे, आणि त्यातील वचने मोठ्याने वाचणे, ती नेहमी आपल्यासमोर ठेवणे, त्यांविषयी चर्चा करणे, हे निराळे असते..

प्राचीन काळी आजच्यासारखी पुस्तके नव्हती. पुस्तकरूपात जे काही असायचे ते हातांनी लिहिलेले असायचे. त्यावेळी परमेश्वर त्याच्या सेवकांशी आणि संदेष्ट्यांशी  स्वतः बोलत असे, आणि त्यानुसार ते इस्राएली लोकांना देवाच्या आज्ञा, विधी, आणि नियम पाळायला सांगत असत. .

मोशे लोकांना म्हणाला होता, “हे इस्राएला, ऐक! आपला देव परमेश्वर हा अनन्य परमेश्वर आहे. तू त्याच्यावर पूर्ण मनाने, पूर्ण जिवाने व पूर्ण शक्तीने प्रीती कर. ज्या आज्ञा मी तुला आज सांगत आहे त्या तुझ्या अंतःकरणात असू दे. त्या तू आपल्या मुलाबाळांच्या मनावर ठसव. घरी-दारी, निजताना-उठताना, त्यांच्याविषयी बोलत राहा. त्या लिहून आठवणीसाठी हाताला बांध व कपाळावर लाव. दरवाजाबाहेर व फाटकांवर त्या लिहून ठेव.” (अनुवाद ६:१-९)

आज जर आपण आपल्या हातांवर आणि कपाळांवर देवाच्या वचनाच्या चिठ्या चिकटवल्या तर ते किती हास्यास्पद दिसेल! पण तसे करायची गरज नाही. कारण आजच्या कम्प्यूटर आणि मोबाइलच्या युगात आपण आपल्या आवडीच्या शास्त्रवचनांचे वॉलपेपर बनवू शकतो. मग जेव्हा जेव्हा आपण कम्प्यूटर किंवा स्मार्टफोनच्या होम पेजवर जातो तेव्हा तेव्हा ती वचने आपल्यासमोर येतात. माझी एक वॉलपेपर गॅलरी इंटरनेटवर खूप लोकप्रिय झाली आहे. त्यात मी सुंदर चित्रे आणि त्यावर लिहिलेली देवाची सुंदर वचने अपलोड करत असतो. आजवर त्यांचे लाखो डाउनलोड झालेले आहेत. देवाची वचने आपल्यासमोर नेहमी असावीत, त्यांची आपल्याला आठवण होत राहावी असे ज्यांना वाटत असेल त्यांनी माझ्या ह्या वेब साइटला भेट द्यावी. https://marathibible.wordpress.com/marathi-bible-wallpaper-gallery/

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s