२५ मे – क्वॉलिटी टाइम

आजचा काळ असा आहे की, पैसा कमावण्यात लोक इतके गुंतलेले असतात की, दिवसाचे २४ ताससुद्धा त्यांना अपुरे पडू लागतात. मग कमावलेला पैसा खर्च करायलाही वेळ राहत नाही. लहान मुलांचेही तसेच झाले आहे. शाळा, कोचिंग, स्पोर्ट, स्पर्धा, कॅम्प, हे सगळे करायला त्यांनाही वेळ पुरा पडत नाही. कौटुंबिक प्रार्थनेची प्रथा लोक विसरून गेले आहेत ते जाऊच द्या, आता तर कुटुंबातील सदस्यांना एकत्र बसून जेवणेदेखील शक्य नसते.

म्हणून कुटुंबामध्ये जवळीक निर्माण करावी ह्या हेतूने सर्वांच्या सोयीची अशी एक वेळ ठरवायची नवीन प्रथा आता सुरू झालेली आहे. त्या वेळेला “क्वॉलिटी टाइम” असे नाव पडले आहे. क्वॉलिटी टाइममध्ये आईवडील मुलांबरोबर स्विमिंग करतात. मुले आईबापांचे फोटो काढतात आणि अपलोड करतात. सगळे मिळून मॉलमध्ये शॉपिंग करतात किंवा एखादा चित्रपट पाहतात. आणि क्वॉलिटी टाइम संपत येताच उद्या किती काम करायचे आहे ह्याची चिंता पुन्हा सुरू होते.

क्वॉलिटी टाइमच्या संदर्भात पवित्र शास्त्रात एक गोष्ट वाचायला मिळते. प्रभू येशू एकदा एका खेड्यातून चालला होता. तेथे मार्था आणि मरिया नावाच्या दोन बहिणी राहत असत. येशू तेथे आला आहे हे कळल्यावर मार्थाने येशूला आपल्या घरी यायचे आमंत्रण दिले. येशू त्यांच्या घरी गेला तेव्हा मरिया त्याच्या चरणांपाशी येऊन बसली आणि त्याचे बोलणे ऐकण्यात मग्न झाली. पण मार्था मात्र घरची कामे करता करता थकून गेली. तिने येशूकडे तक्रार केली, “प्रभू, माझ्या बहिणीनं मला एकटीला सगळं काम करायला सोडलं ह्याची आपण काही पर्वा करीत नाही का? तिला सांगा ना मला मदत करायला. ” येशूने तिला उत्तर दिले, “मार्था, मार्था, तू पुष्कळ गोष्टींच्या काळजीत आणि गोंधळात आहेस. पण एकाच गोष्टीची गरज आहे, कारण मरियेने चांगला भाग निवडला आहे. तो तिच्याकडून काढून घेतला जाणार नाही. ” (लूक १०:३८-४२)

येशूचा हा बोध आपल्या सर्वांसाठी आहे. कारण आपल्या जीवनात देवाला आपण किती वेळ द्यायचा हे शेवटी आपणच ठरवायचे आहे. देवाबरोबर क्वॉलिटी टाइम घालवायचा म्हणजे त्याच्या सान्निध्यात राहायचे, त्याचे बोलणे ऐकायचे, आपल्या काळजीचा भार त्याच्यावर टाकायचा, त्याच्या प्रीतीचा अनुभव घ्यायचा.

(डॉ. रंजन केळकर)

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s