२४ मे – पेन्टेकॉस्ट किंवा पन्नासावा दिवस

जेव्हा प्रभू येशूने त्याच्या शिष्यांना सांगितले की, त्याची पित्याकडे परत जायची वेळ जवळ आली आहे, तेव्हा साहजिकच ते अस्वस्थ झाले. पण येशूने त्यांना समजावण्याचा प्रयत्न केला. तो म्हणाला की, “मी पित्याला विनंती करीन, आणि तो तुमच्याबरोबर सर्वकाळ राहायला दुसरा कैवारी तुम्हाला देईल. तो सत्याचा आत्मा आहे; जग त्याला पहात नाही आणि ओळखीत नाही म्हणून ते त्याचा स्वीकार करू शकत नाही. पण तो तुमच्याबरोबर राहतो, म्हणून तुम्ही त्याला ओळखता, आणि तो तुमच्यात राहील.” (योहान १४:१६-१७)

येशू पुढे म्हणाला, “मी तुम्हाला अनाथ सोडणार नाही… पिता ज्याला माझ्या नावानं धाडील तो कैवारी म्हणजे पवित्र आत्मा तुम्हाला सर्व गोष्टी शिकवील; आणि मी ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्यात त्या सर्व गोष्टींची तुम्हाला आठवण देईल.” (योहान १४:१८,२६)

प्रभू येशूने जे सांगितले होते तसेच घडले. येशूच्या स्वर्गारोहणानंतर दहा दिवसांनी, म्हणजे त्याच्या पुनरुत्थानानंतर पन्नास दिवसांनी, त्याचे शिष्यगण एकत्र जमलेले असताना एक अद्भुत घटना घडली. अकस्मात् सुसाट्याचा वारा सुटल्यासारखा आकाशातून आवाज आला; आणि त्याने ते जेथे बसले होते ते सर्व घर भरले. आणि त्यांना ज्वालेसारख्या वेगळ्या होत असलेल्या जिभा दिसल्या; आणि ती त्यांच्यातील प्रत्येक जणावर एक बसली. आणि ते सगळे पवित्र आत्म्याने भरले जाऊन त्यांना आत्म्याने जशी वाचा दिली, तसे ते अन्य भाषांत बोलू लागले. (प्रे.कृ. २:२-४)

हे काय घडत आहे ह्याची लोकांत चर्चा होत असताना पेत्राने त्यांना योएल संदेष्ट्याने जे लिहिले होते त्याची आठवण करून दिली. “देव म्हणतो, त्या शेवटच्या दिवसांत असे होईल की, ‘मी सर्व मनुष्यांवर माझ्या आत्म्याचा वर्षाव करीन.’ ” (प्रे.कृ. २:१६-१७)

पेन्टेकॉस्ट किंवा पन्नासावा दिवस हा मुळात यहुदी लोकांचा एक सण होता. पण आता तो ख्रिस्ती मंडळीच्या स्थापनेचा दिन म्हणून साजरा केला जातो. ख्रिस्ती मंडळीची वाढ झाली आहे आणि पुढे होत राहील, कारण देवाचा अदृश्य आत्मा प्रत्येक माणसाला ज्ञान आणि शक्ती पुरवतो आणि त्याच्याकडून देवाचे कार्य करून घेतो.

Advertisements

प्रतिक्रिया व्यक्त करा

Fill in your details below or click an icon to log in:

WordPress.com Logo

You are commenting using your WordPress.com account. Log Out /  बदला )

Google photo

You are commenting using your Google account. Log Out /  बदला )

Twitter picture

You are commenting using your Twitter account. Log Out /  बदला )

Facebook photo

You are commenting using your Facebook account. Log Out /  बदला )

Connecting to %s